संघाची अ. भा. प्रतिनिधी सभा यंदा बंगळुरूत

06 Mar 2025 18:09:01
 
RSS Akhil Bharatiya Pratinidhi Sabha Bengaluru

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (RSS Bengaluru Baithak News)
 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा यंदा बंगळुरू येथे होत आहे. बंगळुरूच्या चन्नेनहल्ली येथील जनसेवा विद्या केंद्र परिसरात ही तीन दिवसीय (२१, २२, २३ मार्च) बैठक संपन्न होणार आहे. अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा.प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली. 

हे वाचलंत का? :आधी अजान कोणाची? वादाचे रुपांतर तुफान हाणामारीत

यावेळी २०२४-२५ च्या शेवटच्या वर्षाचे इतिवृत्त ठेवण्यात येणार असून त्यावर विवेचनात्मक चर्चा करण्याबरोबरच विशेष कामांसाठी विनंतीही करण्यात येणार आहे. येत्या विजयादशमीला संघाच्या कार्याला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत, २०२५ ते २०२६ हे वर्ष संघाचे शताब्दी वर्ष म्हणून मानले जाईल. बैठकीत शताब्दी वर्षाच्या कार्याच्या व्याप्तीचा आढावा घेण्याबरोबरच आगामी शताब्दी वर्षासाठी विविध कार्यक्रमांची रूपरेषा तयार करण्यात येणार आहे.

बैठकीत राष्ट्रीय विषयांवरील दोन प्रस्तावांवर विचार करण्यात येणार आहे. तसेच संघ शाखांकडून आवश्यक असलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्यासह पंचपरिवर्तनासाठीच्या प्रयत्नांची चर्चा विशेषतः अपेक्षित आहे. हिंदुत्व प्रबोधनासह देशातील सद्य परिस्थितीचे विश्लेषण आणि आवश्यक कृतींची चर्चाही बैठकीच्या विषय यादीत समाविष्ट आहे.

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे आणि सर्व सहा सह सरकार्यवाह तसेच कार्यकारिणी सदस्यांसह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत प्रामुख्याने राज्य व प्रदेश पातळीवरील १४८० कार्यकर्ते अपेक्षित आहेत. या बैठकीत संघप्रणित विविध संघटनांचे राष्ट्रीय अध्यक्ष, सरचिटणीस आणि संघटन मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.

Powered By Sangraha 9.0