युएई : टीम इंडिया विरूद्ध ऑस्ट्रिलेया दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी सेमीफायनल दुबईमध्ये दि : ४ मार्च २०२५ रोजी पार पडली. या सेमी फयनलमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत वनडे विश्वचषकाचा बदला घेतला आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचा पराभव हा चांगलाच जिव्हारी लागला आहे. मात्र, या सामन्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथने वनडे क्रिकेटला अखेरचा राम राम केला आहे.
टीम इंडियाने ४ गडी खेळाडू राखत कांगारूंवर दणदणीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाविरूद्ध ऑस्ट्रेलियाने चांगली खेळी खेळली होती. ट्रेव्हिस हेड बाद झाल्यानंतर कर्णधार स्टिव्ह स्मिथने चांगली खेळी खेळत सर्वाधित ७३ धावा केल्या आहेत. त्याने एकाकी झुंझ दिली होती. मात्र टीम इंडियाच्या विजयाने त्यांची ही झुंझ व्यर्थ ठरली आहे.
दरम्यान, स्मिथचा वनडे विश्वचषकाचा विचार केला तर त्याने १७० एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यानंतरप ५ हजार ८०० हून अधिक दावा केल्या आहेत. त्याच्या नावावर आता १२ षतके आणि ३४ अर्धशतके आहेत. या समान्यांमध्ये २८ विकेट्सही घेतल्या आहेत. स्टिव्ह स्मिथने बराच काळ ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद भूषविले.
संघाच्या पराभवानंतर त्याने निवृत्तबीबत घोषणा केली तो म्हणाला की, हा एक अद्भुत प्रवास होता. मी त्यातील प्रत्येक क्षण हा आनंदाचा जगला आहे. माझ्याकडे अनेक क्षण आणि आठवणी आहेत. दोन विश्वचषक जिंकणे ही माझ्यासाठी मोठी कामगिरी असल्याचे मी मानतो. माझे अनेक सहकारी होते ज्याच्यासोबत मी हा प्रवास पूर्ण केला.