डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लंडन येथे होणार आंतरराष्ट्रीय परिषद

05 Mar 2025 18:30:47

B R Ambedkar
 
पुणे: ( London International conference on occasion of  Babasaheb Ambedkar birth anniversary ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त लंडन येथे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात येणार आहे. दि. २४ एप्रिल आणि दि. २५ एप्रिल रोजी ही परिषद होणार आहे.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या बहुआयामी जीवनावर लंडन येथे आंतरराष्ट्रीय परिषदसामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (बार्टी) पुणे आणि ’मुंबई विद्यापीठ’, भारत आणि ‘द ऑनरेबल सोसायटी ऑफ ग्रेज इन’, लंडन (युके) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ग्लोबल व्हिजन, न्याय, समता, समानता आणि लोकशाहीची पुनर्कल्पना’ या विषयावर दि. २४ एप्रिल व दि. २५ एप्रिल रोजी लंडन येथे परिषद होणार आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेचे मुख्य उद्दिष्ट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘ग्रेज इन’ आणि ‘लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स’ या विद्यापीठांतील त्यांचा बौद्धिक प्रवास आणि विविध पैलूंचा उजाळा होणे, हे या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0