मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Balidan Mas news kolhapur) कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील सरवडे ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रदीप सूर्यवंशी यांनी मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. 'तुझा बजरंग दल वगैरे काही चालणार नाही, असल्या फालतू गोष्टी घेऊन माझ्या शाळेत येऊ नकोस’, अशी धमकी देत सरपंचाने प्रदीप सूर्यवंशी यांना मारहाण केल्याचे कळतंय. रणधीर मोरे असे सरपंचाचे नाव असून त्यांनी प्रदीप सूर्यवंशी यांच्या केशकर्तनालयाचीही तोडफोड केल्याची माहिती एका वृत्तातून समोर येत आहे. सदर प्रकरणी सरपंच रणधीर मोरे यांच्या विरोधात राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हे वाचलंत का? : सनातन आणि शीख धर्माचे पवित्र संगमस्थान अयोध्या : हरदीपसिंग पुरीछत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी जे बलिदान दिले त्याची जाणीव सर्वांना असावी म्हणून फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या काळात बलिदान मास पाळला जातो. प्रदीप सूर्यवंशी हे प्रत्येक वर्षी छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळतात, तसेच शालेय विद्यार्थ्यांकडून तो साजरा करून घेतात. बलिदानाचे स्मरण काही विद्यार्थ्यांना ते शाळेत अनवाणी आले होते. आपल्या शाळेत असे काही चालणार नाही, यामुळे रणधीर मोरे यांनी प्रदीप सूर्यवंशींना रोखले, त्यांना मारहाण केली आणि याच रागातून त्यांच्या केशकर्तनालयाचीही तोडफोड केल्याचे स्पष्ट होते आहे.