अबू आझमींच्या फळीतले आणखी औरंगप्रेमी...

04 Mar 2025 16:51:03

Aurangapremi Abu Azmi and Team

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Aurangapremi Abu Azmi) 
मराहाष्ट्र नासवू पाहणाऱ्या औरंग्याच्या औलादी कायदेमंडळातही जिवंत असल्याचे उदाहरण अबू आझमीच्या रुपाने समोर आलंय. औरंगजेब क्रूर प्रशासक नव्हता... असे विधान या समाजवादी पार्टीच्या औरंगप्रेमी आमदाराने चक्क विधिमंडळ परिसरात केल्याने राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होऊ लागलाय. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपटातून इतकी वर्ष छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा इतिहास दडवण्याचा प्रयत्न जो अशा औरंगप्रेमी धर्मांधांकडून झाला, त्यांना सणसणीत चपराक या छावा चित्रपटाने दिली. तरी काहींचे औरंगप्रेम अद्यापही उफाळून बाहेर पडताना दिसतंय. अबू आझमींनी असे हिंदूविरोधी भूमिका घेऊन विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही; त्याचबरोबर त्यांच्या फळीतील आणखी काही नावे आहेत जी औरंग्या कसा उत्तम प्रशासक होता हे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगण्याचा प्रयत्न ते करत असतात. 

औरंगजेबावर स्तुतीसुमने उधळत अबू आझमी म्हणाले की, औरंगजेबाबद्दल चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिरे बनवली... मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही... उलट औरंजेबाच्या काळात भारतवर्षाची सीमा अफगाणिस्तान पर्यंत होती. त्यावेळी आपला जीडीपी २४ टक्के होता. तेव्हाच भारताला सोने की चिडीया म्हटले जात होते... त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई धर्माची नसून ती राजकीय होती.

हे वाचलंत का? : मतदार यादीत हेराफेरी? हिंदूंना वगळायचा डाव?

ज्या औरंग्याने छत्रपती शंभूराजे, गुरु तेग बहाद्दूर सिंह, कवी कलश, सख्खा मोठा भाऊ दारा शुकोह यांची क्रूरपणे हत्या केली... ज्याने गुरु गोविंद सिहांच्या चार मुलांना जिवंतपणी भिंतीत गाडलं... ज्या औरंग्याने त्याच्या राज्यातील हिंदूंवर जझिया कर लावला, हिंदूना तलवारीच्या जोरावर धर्मांतर करण्यास भाग पाडलं, तो क्रूर न्हवता म्हणणे म्हणजे आजही औरंग्याच त्या अबू आझमीच्या रूपाने जिवंत आहे असे वाटल्यास चुकीचे ठरणार नाही... काशी विश्वनाथ असो किंवा पंढरपूर यासह उदयपुर परिसरात औरंग्याने ३०० मंदिरे पाडल्याची माहिती आहे. अशा अत्याचारी बादशहाचे उदात्तीकरण हा राष्ट्रीय अपराध आहे, त्याचे कोणी समर्थन करत असतील तर ते देशाचे शत्रूच आहेत.

हे झाले एक.... दुसरे औरंगप्रेमी म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर. मधल्या काळात ते औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन नतमस्तक झाले होते. कबरीसमोर लोटांगण घालायचंच तेवढं बाकी होतं... त्यांच्या म्हणण्यानुसार औरंगजेबाने ५४ वर्ष राज्य केलं. त्याने सुफी परंपरा जपली. मध्यपूर्वेतील इतर मुस्लीम देशांपेक्षा भारतात जास्त मुस्लिम असूनही, या सुफी पंथामुळे येथे कोणीही दहशतवादी संघटनांमध्ये सामील झालेले नाही. अशा होऊन गेलेल्या राजांच्या नावाने देशात चुकीची कथा मांडली जात आहे. त्या कथा सांगून दोन समुदायांमध्ये कटुता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हे झाले दुसरे.... तिसरे म्हणजे... शरद पवार गटाचे आणि मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड. ते एकदा म्हणाले होते की... छत्रपती संभाजी महाराजांना बहादूरगड येथे आणले होते, तिथे त्यांचे डोळे काढण्यात आले. बहादूरगड किल्ल्याजवळ एक विष्णू मंदिर होतं. औरंगजेब क्रूर किंवा हिंदुद्रोही असता तर त्याने ते मंदिरही उद्ध्वस्त केले असते. हे तर काहीच नाही... छावा चित्रपट पाहून आल्यानंतर त्यांनी जी पोस्ट लिहिली... त्यात त्यांनी नेहमीप्रमाणे इतिहासाला जातीय किनार लावण्याचा प्रयत्न तर केला.... परंतु अख्ख्या पोस्टमध्ये कुठेही औरंगजेबाने महाराजांची छळ करुन हत्या केली, अशा संदर्भातील उल्लेख केला नाही. त्यांनी तो जाणीवपूर्वक टाळला, हे मात्र निश्चित. हे कुणाच्या दाढ्या कुरवाळण्यासाठी चाललंय, हे वेगळं सांगायलाच नको. आव्हाडांनी त्यांच्या निष्ठा कुणाला वाहाव्या हा त्यांचा प्रश्न. मात्र, मनुवाद्यांचा बागुलबुवा करून छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी संभ्रम निर्माण करण्याचे काम त्यांनी करू नये.

आज अबू आझमींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होतेय. जी रास्तच आहे.... कारण औरंगजेबाचे कौतुक करणे हे महापापच. अबू आझमींनी हिंदू विरोधी भूमिका घेतल्याची ही पहिली वेळ नाही... मार्च २०२३ मध्ये तत्कालिन महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राज्यात लव्ह जिहादची एकूण लाखभर प्रकरणे असल्याची माहिती उघडकीस आणली होती. या माहितीवर अबू आझमींनी आक्षेप घेत... लव्ह जिहाद वगैरे अस्तित्वातच नाही, असा दावा ठोकला होता.

जुलै २०२३ मध्ये विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अबू आझमींनी जम्मू काश्मीरमध्ये 'फक्त' ८९ काश्मीरी पंडितांचीच हत्या झाली, असे म्हटले होते. ७००-८०० मुस्लिमही त्यात मारले गेले, हजारो मुली गायब झाल्या, याची कुठे चर्चा नाही. द कश्मीर फाइल्स मध्ये दाखवल्याप्रमाणे काहीच घडलेलं नाही. ते सर्व खोट आहे, असे आझमी म्हणाले होते.

 ऑगस्ट २०२३ मधलं म्हणाल....तर आपण वंदे मातरम् म्हणणार नाही कारण, इस्लाममध्ये अल्लाह सोडून कोणालाही वंदन करता येत नाही असं विधान अबू आझमींनी विधानभवनात केलं होतं. फेब्रुवारी २०२४ मध्ये मराठा समाजासोबतच मुस्लिमांनाही नोकरी आणि शिक्षणात ५ टक्के आरक्षण द्या, अशी मागणी अबू आझमींनी केली होती. नोव्हेंबर २०२४ मध्ये तर विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अबू आझमींनी मुफ्ती सलमान अझरी या मौलवीची भेट घेत ईशनिंदा विरोधी कायदा अस्तित्वात यावा या संबंधी चर्चा केली होती, अशी माहिती आहे.

एकीकडे महाराष्ट्र सरकार लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या विरोधात कठोर कायदा आणण्याच्या दिशेने पावले उचलत आहे. मात्र अबू आझमी यांनी सरकारचे हे पाऊल स्वातंत्र्यविरोधी असल्याचे म्हटले आहे. अबू आझमी यांनी महाराष्ट्र सरकारचा हा प्रयत्न संविधान आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या विरोधात असल्याचे वर्णन केलंय. त्यामुळे अबू आझमींविरोधात उचित कारवाई व्हावी... अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया राज्यभरातून उमटू लागल्या आहेत.


Powered By Sangraha 9.0