उत्तर प्रदेशात गेली ८ वर्षे योगी पॅटर्न! ८५ टक्के गुन्हेगारीत घट
31-Mar-2025
Total Views |
लखनऊ : उत्तर प्रदेशातील भाजप सरकारला ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी २०१७ मध्ये सर्वाधिक कायदा आणि सुव्यवस्थेला प्राधान्य देण्यात आले होते असे ते म्हणाले. त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेबाबत यश आले आहे. सरकारचे ८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ८५ टक्के गुन्हेगारीत घट निर्माण झाली आहे. योगी आदित्यनाथ सरकारच्या काळात पोलिसांनी एन्कऊंटर केले आहेत, असे सांगण्यात येत आहे.
भाजप २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत सपाच्या सुरू असणाऱ्या गुंडाराजचा खात्मा करण्याचे आश्वासन योगी आदित्यनाथ केले होते, त्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्या हाती सत्ता आली. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी आपली धोरणं स्पष्ट केली आहेत. गुंडाराज संपवण्यासाठी आदित्यनाथ यांनी अवैध संपत्तीवर अॅक्शन घेतली होती. त्यानंतर आरोपींना तुरूंगात पाठवण्यास भाग पाडले होते. याप्रकरणावर आजही काम सुरू असल्याचे दिसून येते.
संबंधित प्रकरणाच्या एका अहवालात सांगण्यात येते की, ८५ टक्के गुन्हेगारीत घट निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशात सुरू असणाऱ्या चोरीवर, अपहरणासारख्या घटनांवर अंकुश लावण्यात योगी आदित्यनाथ यांचा हात कोणीही धरू शकत नाही. लूटमारीच्या अनेक घटना उत्तर प्रदेशात घडत होत्या. मात्र, आता उत्तर प्रदेशातील घडणाऱ्या अशा अनेक घटनांपासून उत्तर प्रदेश सुरक्षित आहे, कारण हत्यासारख्या घटनांमध्येही ४१ टक्क्यांची घट निर्माण झाली आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितले की, यामागे पोलीस आता आरोपींना अटक करत आहे. त्यांच्या अशा घटनांविरोधात अंकुश लावण्याचा प्रयत्न करू लागली आहे.उत्तर प्रदेशातील या ८ वर्षांमध्ये २२२ गुन्हेगारांचा एन्काउंटर करण्यात आला होता. यामध्ये ८११८ आरोपी घायाळ झाले होते. यानंतर आता आरोपी स्वत:हून पोलीस ठाण्यात जात असल्याची माहिती समोर येत आहेत.
या व्यतिरिक्त लगातार ८० हजार आरोपींना पोलिसांनी तुरूंगात डांबण्यात आले होते. ९०० हून अधिकांवर एनएसए ने कारवाई केली होती. अनेकदा अशा काही लोकांना वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीदरम्यान माफियांना मातीत गाडणार असे त्यांनी सांगितले होते. मात्र, सध्याच्या उत्तर प्रदेशची परिस्थिती ही पूर्वीच्या उत्तर प्रदेशशी केली तर जमीन अस्मानचा फरक स्पष्ट होईल.