लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाचे ‘फेक नॅरेटिव्ह’ जनतेमध्ये ‘सेट’ केल्याने महाविकास आघाडीला राज्यात यश मिळाले. या औटघटकेच्या यशाची हवा मविआ नेत्यांच्या डोक्यात इतकी गेली की, ‘मीच मुख्यमंत्री’ म्हणत सर्वच नेत्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले. त्यात माझ्यामुळेच मविआला यश मिळाल्याची समजूत करून घेत सातव्या आसमानात गेलेल्या उद्धव ठाकरे यांनी तर मुख्यमंत्री म्हणून अनेकवेळी शपथ घेतल्याचे स्वप्न पाहिले असेल. पण, एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाला असा काही सुरुंग लावला की, तो रोखता-रोखता उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नेत्यांच्या तोंडाला फेस आला.
लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाचे ‘फेक नॅरेटिव्ह’ जनतेमध्ये ‘सेट’ केल्याने महाविकास आघाडीला राज्यात यश मिळाले. या औटघटकेच्या यशाची हवा मविआ नेत्यांच्या डोक्यात इतकी गेली की, ‘मीच मुख्यमंत्री’ म्हणत सर्वच नेत्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले. त्यात माझ्यामुळेच मविआला यश मिळाल्याची समजूत करून घेत सातव्या आसमानात गेलेल्या उद्धव ठाकरे यांनी तर मुख्यमंत्री म्हणून अनेकवेळी शपथ घेतल्याचे स्वप्न पाहिले असेल. पण, एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाला असा काही सुरुंग लावला की, तो रोखता-रोखता उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नेत्यांच्या तोंडाला फेस आला. संपूर्ण राज्यभरात ठाकरेंच्या पक्षाला सुरू असलेली गळती थांबण्याचे नाव काही घेईना. पदाधिकार्यांना थांबवण्याचे प्रयत्न त्यांचे नेते सोडा, खुद्द उद्धव ठाकरे यांच्याकडूनही होताना दिसत नाही. इतके कमी की काय, म्हणून विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर ठाकरे यांनी ‘मातोश्री’च्या बाहेर पक्षवाढीच्या दृष्टीने पाऊल टाकलेले नाही. त्यामुळे कार्यकर्ते सैरभैर न झाले, तर नवलच म्हणावे लागेल. त्यात महापालिका निवडणुकांमध्ये जीव अडकलेले उद्धव ठाकरे आता नाशिक पर्यटनावर येत्या दि. 16 एप्रिल रोजी येणार असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच नाशिक दौर्यावर येणारे ठाकरे, शहरात एकदिवसीय शिबीर घेणार आहेत. यावेळी ते कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांमध्ये प्राण फुंकण्यासाठी मार्गदर्शन करणार असल्याचे बोलले जात असले, तरी आधीच गटांगळ्या खात असलेल्या उबाठा गटाला यातून किती फायदा होईल, हा संशोधनाचा विषय ठरेल. उद्धव ठाकरे यांच्यासह विश्वप्रवक्ते संजय राऊत आणि तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. शिबिराला गर्दी जमवण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकार्यांकडून जोर बैठका काढण्याचे काम सुरू असून शहरात विभागनिहाय आणि जिल्हाभर बैठका घेतल्या जाणार आहेत. मात्र, या बैठका घेत असताना उद्धव ठाकरेंच्या जवळच्या शिलेदारांनी पक्षाच्या धोरणाला कंटाळून कधीच दुसरी वाट धरली. त्यामुळे जिल्ह्यात म्हणावे असे पदाधिकारी आता नावालाच शिल्लक आहेत. एकंदरीतच नाशकातील ताकद क्षीण झाल्याने पदाधिकार्यांमध्ये नवचैतन्य जागृतीसाठी घेण्यात येणारे शिबीर यशस्वी होईल का? या संभ्रमात कार्यकर्ते आणि पदाधिकारी असल्याचे चित्र दिसून येते.
विश्वप्रवक्त्यांची पोपटपंची
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुकण्यासाठी म्हणा किंवा कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी म्हणा, उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’च्या बाहेर पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला. मुंबई पाठोपाठ नाशिक मनपाच्या सत्तेत ठाकरे यांचा जीव अडकल्याचे वेळोवेळी समोर आले. राज ठाकरे शिवसेनेत असताना नाशिकमध्ये शिवसेनेचा झेंडा कसा डौलत राहील, साठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. परंतु, अडगळीत टाकण्याचे षड्यंत्र सुरू झाल्यानंतर उद्विग्न मनस्थितीत त्यांनी पक्ष सोडला. त्यानंतर भाजपच्या मदतीने ठाकरे यांचा विजयरथ नाशिक मनपात पुढे सुरू राहिला. पण, ठाकरेंच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे मनपा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकमेकांविरोधात लढले. नाशिककरांनी भाजपच्या पारड्यात मतांचे दान टाकत ठाकरेंना चारीमुंड्या चित केले. त्यानंतर विश्वप्रवक्ते संजय राऊत यांच्याकडे नाशिकची सुभेदारी सोपवली गेली. परंतु, उद्धव ठाकरे यांच्या आडून सूडबुद्धीचे राजकारण करणार्या संजय राऊत यांना कंटाळत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत ठाकरेंना आव्हान दिले. या बंडाच्या काळात नाशिकमधील पदाधिकार्यांनी काही काळ ठाकरेंना साथसंगत केली. परंतु, नाशिकचे संपर्कप्रमुख असलेल्या संजय राऊत यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून पहिल्या फळीतील अनेक पदाधिकार्यांनी शिंदे यांचे नेतृत्व मान्य करत शिवसेनेचा मार्ग पत्करला. अगदी महिनाभरापूर्वीदेखील उबाठा गटाला मोठे खिंडार पडता पडता राहिले. सर्व जगाचे ज्ञान असणारे राऊत उबाठा गटाकडून दि. 16 एप्रिल रोजी नाशकात पार पडणार्या कार्यकर्ता शिबिरात मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले जात आहे. आता संजय राऊत आपल्या पोपटपंचीतून कोणता वाद निर्माण करणार, या विचाराने नाशिककरांच्या पोटात आतापासूनच भीतीचा गोळा आला आहे. कारण, राऊतांनी तोंड उघडले की शांततेत भंग झाल्याचा अनुभव जनतेने घेतला आहे. त्यामुळे दि. 16 एप्रिल रोजीनंतर नाशिकची शांतता भंग होणार नाही ना, या विचारात नाशिककर पडले आहे. कारण, एखादा नेता येतो. आपले विखारी विचार मांडून परत स्वगृही परततो. मात्र, त्याच्या बोलण्याने हिंसक वळण मिळाले की, त्याचा त्रास स्थानिक जनतेलाच सोसावा लागतो. म्हणून कधीकाळी उद्धव ठाकरेंसाठी सत्तेच्या पायघड्या अंथरणार्या नाशिकमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, एवढेच विश्वप्रवक्त्यांना सांगणे.
विराम गांगुर्डे