चंदीगड : हरियाणाची सुप्रसिद्ध असलेली बॉक्सर स्वीटी बोरा (Sweety Bora) आणि कबड्डीपटू दीपक हुड्डा या पती-पत्नीतील वाद आता आणखी वाढला आहे. स्वीटीने अलीकडेच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता, ज्यात तिला गंभीर दुखापत झाली आहे. स्वीटीने आरोप केला की, तिचा पती दीपक हुड्डा तिला अनेकदा मारहाण करत असायचा. तसेच अनेकदा तिचा शारीरिक आणि मानसिक छळही करण्यात आला होता, असा आरोप पत्नी स्वीटीने केला आहे. त्यानंतर तिने असाही आरोप केला की, दीपक तिला घराबाहेर जाण्यास कोणतीही परवानगी देत नव्हता आणि त्याने आपली गाडीही काढून घेतली होती. स्वीटीने एका वृत्तावाहिनीशी बोलताना सांगितले की, दीपक तिचे कपडे काढून तिला मारहाण करायचा. तिने कोणासोबत बोलायचे हे तिनेच ठरवायचे हेही दीपक ठरवत आहे, असे तिने म्हटले आहे. दीपकचे इतर महिलांसोबत अफेअर होते, ही माहिती तिला लग्नानंतर एका महिन्यानंतर समजली होती. संबंधित प्रकरणाचे अनेक पुरावे न्यायालयात सादर करणार असल्याचे ती म्हणाली.
तिने आपल्या जखमांचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती गंभीर जखमी झाली आणि तिला दुखापतही झाली होती. स्वीटीने असाही आरोप केला होता की, दीपकने तिला ५-५ दिवस घरामध्ये कोंडून ठेवले होते, आणि घराबाहेर जाण्यापासून मज्जाव करण्यात आला होता. दीपकने त्याची गाडी आपल्या पत्नीच्या ताब्यात देण्यापासून विरोध केला होता. पुढे ती म्हणाली की, मी १४ व्या मजल्यावर राहत होती तेव्हा मी खाली येण्याआधीच दीपक घरी पोहोचायचा. दीपक तिचा मोबाईल फोन स्कॅन करून पाहायचा. तिचे सर्वाधिक फोन कॉल्स कोणासोबत आणि किती वेळ झाले आहेत ही माहिती काढून घ्यायचा, असा स्वीटीने आरोप केला.
स्वीटीने असाही आरोप केला आहे की, दीपकने तिला ५-५ दिवस घरात कोंडून ठेवले आणि घराबाहेर जाण्यापासून रोखले. दीपकने त्याची गाडीही ताब्यात घेतली होती. स्वीटी म्हणाली की ती १४ व्या मजल्यावर राहत होती आणि जेव्हा ती खाली येत असे तेव्हा दीपक आधीच घरी पोहोचलेला असायचा. दीपक तिचा फोनही स्कॅन करायचा आणि ती कोणाशी आणि किती वेळ बोलायची ही माहिती मिळवायचा, तसेत तिने इतरांशी किती वेळ आणि कोणाशी बोलायचे हे त्यानेच ठरवायचे, असा दावा स्वीटीने केला आहे.
हे प्रकरण १५ मार्च रोजीचे असून जेव्हा स्वीटी बोरा आणि दीपक हुड्डा हिसारमधील महिला पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. याच हिसार पोलीस ठाण्याचा व्हिडिओ २४ मार्च रोजी समोर आला होता, त्यानंतर स्वीटीने सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिले होते. स्वीटीने तिला फोन करत घटनेसंबंधित रेकॉर्ड करण्यात आलेल्या बाबी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. व्हिडिओच्या सुरूवातीला आणि शेवटी, दीपक तिच्याशी गैरवर्तन करत होता. स्वीटी म्हणाली की, व्हिडिओमधील तिला त्रास देण्यात आलेल्या व्हिडिओमधील काही भाग काडून टाकण्यात आले होते. व्हिडिओच्या शेवटी आणि सुरूवातीला दीपकने तिच्यासोबत गैरवर्तन केले होते.
पोलीस ठाण्यातील काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यावरून हे सिद्ध होते की, हिसारच्या एसपींनीही या प्रकरणात दीपकसोबत इतरांचा सहभाग असल्याचा आरोप स्वीटीने केल्याचा सांगण्यात येत आहे. स्वीटी बोरा ही एक प्रसिद्ध बॉक्सिंग चॅम्पियन आहे, तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे नाव शिखरावर नेऊन ठेवले आहे. तर, दीपक हुड्डा हा एक कबड्डी खेळाडू असून त्यांनी काही वर्षांआधी एकमेकांसोबत विवाह केला होता.