लखनऊ (Muskan Murder) : उत्तर प्रदेशातील बदायूमध्ये १८ फेब्रुवारी २०२५ रोजी एका डान्सर पत्नीची तिच्या पतीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पतीने दोघांच्या मदतीने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. पत्नीचे नाव मुस्कान असून वय वर्षे २८ होते. पती रिझवानकडे मुस्कानने प्रतिमहा ४० हजार रूपयांची मागणी केल्याने पती संतापू लागला होता याच गोष्टीला घेऊन त्याने आपल्या पत्नीची हत्या केली. त्यानंतर तिचे प्रेत खड्ड्यात गाडण्यात आल्याचे आढळून आले आहे.बदायूचे एसपी सिटी यांनी सांगितले की, २८ वर्षीय मु्स्कानने दातागंज क्षेत्रातील हाशिमपुरमधील रहिवाशी होती. ती इतर कार्यक्रमांमध्ये डान्स करायची. तिची भेट उझानी क्षेत्रातील रिझवानसोबत झाली होती.
मुस्कानने मागील ४ वर्षांआधी रिझवानसोबत निकाह केला होता. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी मुस्कान गायब झाली होती. त्यानंतर मामा नूर हसनने पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांना मुस्कानचा पती रिझवानवर संशय आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता, मुस्कानच्या हत्येची बाब समोर आली होती. रिझवानने सांगितले की, मुस्कानची हत्या करण्यासाठी इतर दोन्ही साथीदारांच्या मदतीने संपवण्यात आले होते.
हत्या केल्यानंतर खूनाचा तपास मिटवण्यासाठी रिझवानने मु्स्कानची हत्या करत नरऊच्या एका शेतात पीडितेचे धड खोदून जमिनीत पुरण्यात आले होते. या प्रकरणात अटकेतून वाचण्यासाठी रिझवान जून्या प्रकरणांचा आपला जामीन रद्द करत तो तरूंगात गेला होता.