प्रशांत कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

31 Mar 2025 15:53:10

Prashant Koratkar judicial custody for 14 days
 
कोल्हापूर : ( Prashant Koratkar judicial custody for 14 days ) छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणार्‍या प्रशांत कोरटकरला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
 
पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्याने आता कोरटकरकडून तातडीने जामिनासाठी अर्ज केला जाण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर मंगळवार, दि. २५ मार्च रोजी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
 
यानंतर दि. २८ मार्च रोजी कोरटकरला पुन्हा एकदा हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. रविवार, दि. ३० मार्च रोजी पुन्हा प्रशांत कोरटकरला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0