कट्टरपंथी मुस्लिमांना नवरात्रोत्सवापासून दूर ठेवा! दिनेश फलाहारी यांचे योगी आदित्यनाथ यांना पत्र

30 Mar 2025 16:31:14
 
Yogi Adityanath
 
 
लखनऊ : श्री कृष्ण जन्मभूमि संघर्ष न्यासाचे समर्थक दिनेश फलाहारी यांनी शनिवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कट्टरपंथी मुस्लिमांना नवरात्रोत्सवापासून दूर राहण्याची मागणी केली आहे. त्यावेळी मांस विक्रीवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली आहे.
 
ते म्हणाले की, काही लोक आपल्या सनातन धर्माला आणि पवित्र ग्रंथांना बदनाम करत आहेत. लोकांना यासर्वांपासून लांब राहणे गरजेचे आहे. कोणत्याही हिंदूला वाटत नाही की त्यांनी आमच्या पवित्र सणांमध्ये यावं. हे लोक लव्ह जिहादला प्रोत्सहान देतात, प्रसादामध्ये थुंकत असतात. योगी आदित्यनाथ यांनी निवेदन केले की, नऊ दिवसांपर्यंत देवी मातेपासून मुस्लिम कट्टरपंथीयांना दूर ठेवले जावे.
  
सांगण्यात येत आहे की, याआधी दिनेश फलाहारी यांनी योगी आदित्यनाथ यांना रक्ताने पत्र लिहून संबधित प्रकरणी आग्रह धरण्यात आला होता. होळी सणानिमित्त कट्टरपंथी मुस्लिमांची दुकाने बंद करावीत. त्यांनी पत्रात लिहिले की, कट्टरपंथी मुस्लिम हे हिंदूं सणांचा द्वेष करतात. मात्र, दुकान लावत पैसेही कमावतात, असे त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0