मुस्लिम लीग आणि काँग्रेसमध्ये जवळीकता वाढली, इफ्तार पार्टीसाठी प्रियंका गांधी दाखल

    30-Mar-2025
Total Views |

काँग्रेस
 
तिरूअनंतपुरम : केरळ राज्यातील वायनाड मतदारसंघाच्या खासदार काँग्रेस नेत्या आणि राहुल गांधींच्या भगिनी प्रियंका गांधी यांनी शनिवारी इंडियन मुस्लिम लीगचे प्रदेश अध्यक्ष सदीख अली शिहाब थंगल यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीत हजेरी लावली होती. प्रियंका गांधी यांच्या पनाक्कडमधील भेटीची ही पहलीच वेळ होती. त्यानंतर नेत्यांनी भेटीबद्दल आनंद व्यक्त केला आणि ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियंका गांधींची भेट राजकीय नव्हती तर ही एक सदिच्छ भेट होती, असे थंगल यांनी स्पष्ट केले.
 
मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांगण्यात आले की, थंगल यांच्या घरी शनिवारी २९ मार्च २०२५ रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. वायनाडच्या दौऱ्यावर असताना त्यांनी इफ्तार पार्टीला हजेरी लावली असल्याचे नाकारता येणार नाही. मात्र, यावर थंगल म्हणाले की, वायनाडमध्ये भूस्खलनग्रस्त भागात आययुएमएलच्या पुनर्वसन प्रकल्पाबाबत सविस्तर चौकशी करण्यात आली आहे. मात्र, आम्ही कोणतीही एक राजकीय चर्चा केली नसल्याचे थंगल म्हणाले आहेत.
 
इफ्तार पार्टीत काँग्रेससोबतच आता IUMLचेही काही वरिष्ठ नेते थंगल यांच्या घरी आले होते. यावेळी प्रियंका गांधींचे स्वागत हे पी.के. कुन्हालीकुट्टी यांनी केले. अशातच आता एक माहिती समोर येत आहे की, नीलांबरमध्ये विधानसभा निवडणूक सुरू हेणार आहे. यावेळी प्रियंका गांधी यांनी मतदारसंघात जाऊन स्थानिक नेत्यांसोबत हिजगुज साधले. त्यानंतर त्यांनी सामान्य लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्नही केला होता. यावेळी त्यांनी केरळातील नागरिकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
 
सध्या देशात भाजपचे सरकार असून भाजप हिंदुत्ववादी विचारसरणीचा जागर करत आहे. याचमुळे आता काँग्रेसही मतांच्या हव्यासापोटी मुस्लिम लीगसोबत अनेकदा एकत्र येताना दिसते आहे. मुस्लिम लीग आणि काँग्रेस एकत्र येण्याची चिन्हे नाकारता येणार नसल्याच्या चर्चांना तोंड फुटू लागले आहे. दरम्यान दोन्ही पक्षांची युती घट्ट आहे. इफ्तार पार्टीला देण्यात आलेली भेट या युतीसाठी आणखीच जमेची बाजू असणार आहे. प्रियंका गांधी यांनी इफ्तार पार्टीला दिलेली भेट चर्चेचा विषय ठरत आहे.