उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरचे नामांतरण होणार 'लक्ष्मीनगर'?

    30-Mar-2025
Total Views |

 

मुझफ्फरनगर  
लखनऊ : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरचे (Muzaffarnagar) नाव बदलण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. हिंदू युवा वाहिनीच्या सदस्यांनी शहरात सर्वत्र पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्समध्ये मुझफ्फरनगरचे नाव बदलण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. हिंदू युवा वाहिनीच्या सदस्यांनी शहरात सर्वत्र पोस्टर्स लावण्यात आले आहेत. शनिवारी रेल्वेस्थानक आणि मुख्य रस्त्यांवर मुझफ्फरनगरऐवजी लक्ष्मीनगर नाव लिहिलेले बॅनर दिसू लागले आहेत.

नाव बदलण्याच्या मागणीवर अनेक नेत्यांनी आपली मतं मांडली आहेत. मुझफ्फरनरातील किंवा लक्ष्मीनगर या दोन्हींशी आमचा कोणताही एक वाद नाही. हे प्रकरण आता राज्य सरकारच्या अखत्यारीत येते. एनडीएचा भाग म्हणून,केंद्र किंवा उत्तर प्रदेश सरकार जो काही निर्णय घेईल तो आम्ही स्वीकारू, असे बुढाना आमदार राजपाल बल्यान म्हणाले. शनिवारी उपस्थित असणाऱ्या धीरेंद्र सिंह शास्त्री यांच्या निर्णयाचे समर्थन करण्यात आले.

या महिन्याच्या सुरूवातीला, भाजपचे एमएलसी मोहित बेनीवाल यांनी उत्तर प्रदेश विधान परिषदेत ही मागणी उपस्थित करण्यात आली होती. यावर त्यांनी जिल्ह्याचे नाव बदलणे म्हणजे एक प्रकारे जनतेच्या भावनांशी खेळणेच. मात्र, यामुळे जिल्ह्याला एक नवीन ओळख प्राप्त होईल. शहराचे नाव हे केवळ बॅनरवरच दिसणारच नाहीतर आता प्रत्यक्षात दिसणार आहे.