कोलकाता : प. बंगालच्या मालदा जिल्ह्यानंतर मुर्शिदाबाद (Marshidabad) जिल्ह्यातील नौदामध्ये एका हिंसेला घेऊन पोलिसांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. पोलिसांनी एक्स ट्विटर लिहिले की, मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नौदात मोठा उपद्रव झाला. ज्यात हिंदूंच्या दुकानांना लक्ष्य करण्यात आले आहे. तसेच काही हिंदूंच्या शेतांचे, पिकांचे नुकसान करण्यात आले आणि तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत ६ लोकांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून आरोपींची शोधमोहिम सुरू आहे. संबंधित परिस्थिती नियंत्रणात आली असून पोलिस पुढील चौकशी करत असल्याची माहिती आहे.
प. बंगाल पोलिसांनी सांगितले की, जर समाजात तेढ निर्माण होत होऊन शांततेचा भंग होत असेल तर त्याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई होईल, असे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित घटनेची परिस्थिती लक्षात घेता अफवांवर विश्वास ठेवू नका, असे पोलिसांनी सांगितले आहे. अफवा पसरवणाऱ्यालाही ताब्यात घेऊन चांगला धडा शिकवला जाईल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे समाजमाध्यमांवरील अफवांना फार गंभीरतेने घेवू नये. सांगण्यात येते की, घटनेआधी मालदात दोन समुदायांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यावेळी अफवा पसरवणाऱ्यांनाही पोलिसांनी चांगलाच समज दिला आहे. आम्ही सर्वांना विनंती करतो की, सोशल मीडियावरील अफवांवर दुर्लक्ष करा, या घडलेल्या घटनेनंतर बंगाल पोलिसांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती आणि त्यात हे सर्व नमूद करण्यात आले होते.
प. बंगालमधील मालदा हिंसाचार हा शनिवारी झाला होता. मालदामध्ये अनेक वर्षांपासून शांतता प्रस्थापित होती. यावेळी ईद-उल-फितर आणि राम नवमीदरम्यान, संबंधित परिस्थितीबाबत आता लोकांना सावध करण्यात आले आहे. प.बंगालचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षक जावेद शमीम यांनी लोकांना कोणत्याही खोट्या बातम्या, व्हि़डिओ आणि भडकाऊ संदेश सोशल मीडियावर शेअर न करण्याचे आवाहन केले आहे. जर अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांना त्याची माहिती द्यावी, असे पोलिसांनी सांगितले आहे. काही भागांमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, असे पोलिसांनी सांगितले होते. सणांच्या काळात लोकांच्या भावना भडकण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.