ती येतेय..., तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत दयाबेन लवकरच परतणार! सविस्तर वाचा...

29 Mar 2025 12:26:19
 
dayaben will soon return to the series taarak mehta ka ooltah chashmah
 

मुंबई : लोकप्रिय टीव्ही मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ लवकरच मोठ्या बदलाच्या तयारीत आहे. गेल्या १६ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी लोकप्रिय टीव्ही मालिका तारक मेहता का उल्टा चश्मा लवकरच मोठ्या बदलाच्या तयारीत आहे. मालिकेतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या दयाबेनच्या व्यक्तिरेखेसाठी नव्या अभिनेत्रीची निवड झाली असून, तिच्यासोबत मॉक शूटिंगलाही सुरुवात झाली आहे.
 
 
दयाबेनच्या पुनरागमनाची उत्सुकता
दयाबेन म्हणजेच दिशा वकानी २०१७ मध्ये मातृत्व रजेसाठी गेल्यानंतर मालिकेत परतली नाही. तिच्या पुनरागमनाची चर्चा अनेकदा रंगली, पण कोणतीही ठोस घोषणा करण्यात आली नव्हती. निर्माते असित मोदींनी वेळोवेळी दिशाला परत आणण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या वैयक्तिक कारणांमुळे ते शक्य झाले नाही.
 
 
नव्या अभिनेत्रीची निवड पूर्ण – मॉक शूटला सुरुवात!
सूत्रांच्या माहितीनुसार, दयाबेनच्या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्रींच्या ऑडिशन्स घेण्यात आल्या होत्या. त्यातून एका अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे. ही अभिनेत्री कोण आहे, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, ती आता मालिकेच्या संपूर्ण टीमसोबत मॉक शूट करत असून, तिच्या अभिनयाने असित मोदी आणि दिग्दर्शक भारावून गेले आहेत.
 
 
लवकरच होणार मोठा खुलासा!
प्रेक्षक अनेक वर्षांपासून दयाबेनच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. त्यामुळे या नव्या अभिनेत्रीला स्वीकारले जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मालिकेच्या टीमने प्रेक्षकांना आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करण्यास सांगितले असून, लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल.



Powered By Sangraha 9.0