जयपूरमध्ये वीर तेजाजी महाराज मूर्तींची धर्मांधांकडून विटंबना
29-Mar-2025
Total Views |
जयपूर : राजस्थानातील जयपूरच्या सांगानेर परिसरात शुक्रवारी २८ मार्च २०२५ रोजी वीर तेजाजी महाराज (Veer Tejaji Maharaj) मंदिरातील मूर्तीची तोडफोड करण्यात आली. यामुळे मूर्तीची विटंबना झाली असून लोकांच्या आस्थेला छेद निर्माण झाला आहे. त्यामुळे आता लोकांनी संतप्त भूमिका व्यक्त केली आहे. संबंधित प्रकरण हे प्रतापनगर सेक्टर ३ चे आहे. शनिवारी २९ मार्च २०२५ रोजी सकाळी भाविकांनी पाहिले असता त्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर टायर जाळण्यात आले असून तीन तास रास्ता रोको सुरू होते.
एका अहवालानुसार, सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मंदिराबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी दाखल होत आरोपीला अटक करण्याची मागणी केली. यावेळी पोलिसांनी जमलेला जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र काही केल्या जमाव पांगवला जात नव्हता. त्यानंतर संबंधित परिस्थिती पाहता पोलिसांनी जमलेल्या जमावार हल्ला करत जमाव पांगवण्यात त्यांना यश आले. मात्र नागरिक अद्यापही संतप्त असून वातावरण अद्यापही गरम आहे.
नागौरचे खासदाक हनुमान बेनीवाल हे योग्य वेळी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर धार्मिक भावनांना छेद पोहोचवण्याची योजना होती. त्यांनी जयपुर पोलीस कमिश्नरांना फोन करत घडलेल्या घटनेची माहिती मिळवत कारवाईची मागणी करण्यात आली होती.
यानंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पथक घटनास्थळी दाखल केले, मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, लवकरात लवकर आरोपींच्या मुसक्या आवळण्यात येणार आहेत. त्यानंतर आरोपींच्या मुसक्या आवळून काम चालणार नाहीतर धार्मिक स्थळांची सुनिश्चिती करणे गरजेची आहे. ही घटना जयपूरसाठी अगदीच लांच्छनास्पद आहे.