मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळाने वीज दर निश्चितीचे आदेश दिले असून वीजदरात दहा टक्के घट होणार आहे. गुढीपाडव्याच्या मुर्हूर्तावर राज्य सरकारने सर्वसामान्यांना ही गोड बातमी दिली असून यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महावितरण कंपनीकडून महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. यावर सुनावण्या पार पडल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळाने वीज दर निश्चितीचे आदेश दिले. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने जारी केलेल्या आदेशानुसार, वीज दरात तब्बल १० टक्के घट करण्यात आली आहे. येत्या १ एप्रिलपासून नवे दर लागू होतील.
हे वाचलंत का? - गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरेंची तोफ धडाडणार! पाडवा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क सज्ज
महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडून वीजेसंदर्भात नवे दर लागू करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे सर्वसामान्य घरगुती ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळाने वीज दर निश्चितीचे आदेश दिले असून पुढील पाच वर्षांसाठी वीजदरात दहा टक्के घट होणार आहे.