'त्या' कर्मचाऱ्यांची गुढीपाडवा, रमजान ईदची सुट्टी रद्द! अध्यादेश निघाला - वाचा सविस्तर

    29-Mar-2025
Total Views |
 
Mantralaya
 
मुंबई : उद्योग, ऊर्जा तसेच कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांची गुढीपाडवा आणि रमजान ईदची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. शुक्रवार, २८ मार्च रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
 
यामध्ये वित्तीय वर्षाच्या अखेरीस करावयाच्या अर्थसंकल्पीय कामकाजासाठी शासकीय सुट्टीच्या दिवशी कामावर उपस्थित राहण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. ऊर्जा विभागाचे विशेष कार्य अधिकारी, अवर सचिव आणि कक्ष अधिकाऱ्यांना हा आदेश लागू होईल.
 
हे वाचलंत का? -  पंढरपूर कॉरिडॉरचे काम तीन महिन्यात सुरु करणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
 
सन २०२४-२५ या वित्तीय वर्षाच्या मार्च महिन्याच्या अखेरीस अर्थसंकल्पीय कामकाज करणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित प्रकल्प कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिनांक २९, ३० आणि ३१ मार्च २०२५ रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशी कामावर उपस्थित राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.