रोजा होण्याआधीच आम्ही तुमचे तुकडे तुकडे करू!

    29-Mar-2025
Total Views |

Hindu
 
दिसपुर : एका मुस्लिम युवतीसोबत १४ फेब्रुवारी रोजी विवाह केल्यानंतर तपन दास नावाच्या एका २८ वर्षीय हिंदू व्यक्तीला आणि त्याच्या संबंधित कुटुंबाला रजमानपूर्वीच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही घटना आसाममधील दिब्रुगड जिल्ह्यतील तालूका गावात घडली आहे. आपण जोडप्याला आमच्याकडे पाठवून द्या नाहीतर आम्ही तुकडे तुकडे करू, अशी धमकीच मुस्लिम युवतीच्या कुटुंबीयांनी दिल्ली आहे. 
 
एका प्रसारमाध्यमाने मिळवलेल्या माहितीनुसार पोलीस तक्रार दाखल करण्यात आली. मुस्लिम युवतीचे कुटुंबीय तपन दासच्या विधवा आई आणि बहिणीला धमकावत आहेत. अनेक फोन नंबरवरून कॉल करण्यात आले होते. त्यावेळी पीडितांनी गंभीर परिणामाचा इशारा दिला आहे. ज्यात खूनाबाबत नमूद करण्यात आले आहे. गुरूवारी २७ मार्च रोजी विधवा महिलेला तिच्या मुलाला आणि सुनेला ताब्यात देण्याची मागणी करणारा फोन आला, अन्यथा तिचा आणि तिच्या मुलीचा मृत्यू होऊ शकतो.
 
 
 
ईदआधी युवती आणि युवक आमच्याकडे पाठवून द्या, अन्यथा आम्हीच आमची माणसं तुमच्या घरी पाठवून तुम्हाला आणि तुमच्या आईला मारून आणि त्यांचे तुकडे तुकडे करू, असे तिच्या सुनेच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या तक्रारीत म्हटले आहे. मी एक विधवा महिला असून ती माझ्या लहान मुलांसोबत वास्तव्य करते. आमची कालझ घेणारी व्यक्ती इतर आणखी कोणीही नाही. गंभीर परिणामांचा धोका खपूच चिंताजनक आहे. मी दोषींना कायद्याच्या नियमानुसार अटक करण्याची शिक्षा करण्याची विनंती करते, असे तपन दासच्या आईने पोलिसांना सांगितले.
 
दरम्यान अशातच आता विवाहीत हिंदू पुरूष आणि त्याची मुस्लिम पत्नी सध्या फरार आहेत, असे सांगण्यात येत आहे.