अटलजी ते मोदी सर्वांसोबतच्या सुंदर आठवणींना उजाळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही घिबली ॲनिमेची भुरळ

29 Mar 2025 14:51:03
 
CM Ghibli Image
 
(Photo Feature) सोशल मीडियावर सध्या ‘घिबली’ स्टाईलने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. घिबली स्टाईलने आपल्या फोटोंना इफेक्ट देण्याचा ट्रेंड सुरु असून अने सोशल मीडिया युजर्स आपले फोटो घिबली स्टाईलमध्ये बदलून पोस्ट करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील चॅट जीपीटीच्या घिबलीचा वापर केला केला आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर घिबली स्टाईलमधील वेगवेगळे फोटो पोस्ट केले आहेत.
 

CM Ghibli Image
CM Ghibli Image 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा घिबली स्टाईलमधील फोटो शेअर केला आहे. यात पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि कन्या दिवीजा दिसत आहेत.
 

CM Ghibli Image 
CM Ghibli Image
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, २८ मार्च रोजी ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिरात दर्शन घेतले. घिबली शैलीचा वापर करून तेथील एक फोटो त्यांनी शेअर केला आहे.
 
 
CM Ghibli Image
CM Ghibli Image
 
माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्यासमवेत असलेला एक जूना फोटो घिबली शैलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केला आहे. यात अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बाल वयातील फोटो आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0