वॉशिंग्टन डी.सी. : अमेरिकेच्या ह्यूस्टन विद्यापीठात सुरू असलेला लिन्ड हिंदू रिलिजन हा अभ्यासक्रम सध्या चर्चेचा विषय आहे. भारतीय अमेरिकन विद्यार्थ्याने या अभ्यासक्रमाविरूद्ध हिंदूफोबिया म्हणजेच संबंधित अभ्यासक्रम हा हिंदूविरोधी असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. त्यांनी म्हटले की, हा मार्ग हिंदू धर्माचे चुकीचे प्रतिनिधित्व केले आणि यातूनच राजकीय परिस्थिती विकोपाला गेली.
तर अशातच आता दुसरीकडे विद्यापीठाने बचाव करत म्हटले की, हा अभ्यासक्रम शैक्षणिक स्वातंत्र्याचा एक भाग आहे. त्यात कोणत्याही धर्मविरूद्ध भेदभावही नाही, या वादामुळे सोशल मीडियापासून ते वर्तमानपत्रांपर्यंत एकच खळबळ उडाली आहे.
भारतीय-अमेरिकन विद्यार्थी वसंत भट्ट यांनी आरोप केला की, अभ्यासक्रम शिकवणारे प्राध्यापक आरोन मायकल उलरे हिंदू धर्माला वसाहदवादी रचना म्हणून चित्रित करतात. भट्ट यांच्या मते प्राध्यापक म्हणतात की,हिंदू हा शब्द अलिकडच्या काळात समाविष्ट करण्यात आलेला आहे. या अभ्यासक्रमामध्ये असाही दावा करण्यात आला की,हिंदू राष्ट्रवादी इतर धर्मांना, विशेषत: इस्लामला बदनाम करण्यासाठी "हिंदूत्व" हा शब्द वापरता येतो.
भट्ट यांनी अभ्यासक्रमातील काही भाग शेअर करण्यात आले आहेत. ज्यात नमूद करण्यात आले की, हा शब्द अगदीच नवीन असून जून्या धर्मग्रथांमध्ये आढळून येत नाही. आपली ओळख पटवण्यासाठी हिंदू शब्द वापरण्यात येतो, असे त्यात नमूद करण्यात आले होते. त्यामुळे आता भट्ट आणि अनेक हिंदू विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आणि त्यांना वाटते की,हा त्यांच्या श्रद्धेवर हल्ला केल्यासारखेच आहे.
एवढेच नाहीतर संबंधित अभ्यासक्रमात नरेंद्र मोदी यांना हिंदू कट्टरपंथी म्हणण्यात आले आहे. भारताचे वर्णन हिंदू राष्ट्रवादी देश म्हणून गणले आणि अल्पसंख्याकांवरील अत्याचारांचा आरोप करण्यात आला. भट्ट यांनी याला बौद्धिकदृष्ट्या पोकळ आणि हिंदूफोबिया म्हटले आहे. समाज माध्यमांवरही लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
या दाव्यांसाठी कोणताही एक पुरावा नाही. राजकीय मतभेद असणे चुकीचे नाही पण हिंदूंची बदनामी करणे चुकीचे असल्याचे हिंदू ऑन कॅम्पस नावाच्या एका विद्यार्थी गटाने म्हटले. भट्ट यांनी कॉलेज ऑफ लिबरल आर्ट्स अँड सोशल सायन्स डीनकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यानंतर विद्यापीठाने चौकशी सुरू केली आहे.
सोशल मीडियावरील वाढत असलेला वाद पाहून, हिंदू ऑन कॅम्पसने ट्विट केले की, मोदींवर विशिष्ट पाठ्यपुस्तकाद्वारे करण्यात आलेला हल्ला हा वांशिक आणि धार्मिक आहे. अनेकांनी याला उदारमतवादी शिक्षणातील हिंदूविरोधी वृत्तीचा पुरावा म्हणून पाहिले.