पिंक ई-रिक्षासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

28 Mar 2025 15:55:39

applications for Pink e-rickshaw
 
 
नाशिक: ( applications for Pink e-rickshaw ) “महिला व बालविकास विभागाच्या दि. ८ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील महिला व मुलींना रोजगारनिर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणे यांसह सुरक्षित प्रवासासाठी गरजू महिलांना पिंक (गुलाबी) ई-रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 
त्यानुसार नाशिक शहरासाठी तब्बल एक हजार महिला लाभार्थ्यांना हा लाभ देण्यात येणार आहे. पात्र महिलांनी अर्ज सादर करावेत,” असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाने यांनी केले आहे.
 
सदर योजनेंतर्गत लाभार्थी वय आता २० ते ४० वर्षांऐवजी सुधारित लाभार्थी वय २० ते ५० असे करण्यात आले आहे. पिंक (गुलाबी) ई-रिक्षासाठी करावयाचे अर्ज व आवश्यक कागदपत्रांची यादी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय नाशिक तसेच.
परीहळज्ञ.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर, महानगरपालिका, नाशिक मुख्य कार्यालय व जवळच्या अंगणवाडी केंद्रात उपलब्ध आहेत. इच्छुक महिलांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नासर्डी पुलाजवळ, नाशिक क्लब समोर, नाशिक-पुणे रोड, नाशिक येथे सादर करावेत, असेही नमूद करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0