‘एसटी’कडून उन्हाळी सुट्यांसाठी जादा वाहतूक

28 Mar 2025 12:36:44
 
ST provide extra rounds for summer holidays
 
मुंबई: ( ST  provide extra rounds for  summer holidays ) उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा’मार्फत दरवर्षीप्रमाणे जादा वाहतूक करण्यात येणार आहे. यंदादेखील उन्हाळी जादा वाहतुकीसाठी दररोज लांब पल्ल्याच्या ७६४ फेर्‍यांचे नियोजन करण्यात आले असून या सर्व फेर्‍या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
 
दरवर्षी उन्हाळ्याच्या सुटीत दि. १५ एप्रिल ते दि. १५ जून रोजीपर्यंत ‘एसटी’मार्फत नियोजित फेर्‍यांव्यतिरिक्त जादा वाहतूक केली जाते. ‘एसटी’च्या मध्यवर्ती कार्यालयामार्फत राज्यातील विविध मार्गांवरील ७६४ जादा फेर्‍यांना मंजुरी देण्यात आली.
 
प्रवाशांच्या सोयीसाठी ‘रा. प. महामंडळा’च्या अधिकृत मोबाईलअ‍ॅपद्वारे आणि ‘रा. प. महामंडळा’च्या बसस्थानकांवरील आरक्षण केंद्रांवर आगाऊ आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी प्रवाशांना उन्हाळ्याच्या सुटीतील प्रवासाचे नियोजन करून महामंडळाच्या मार्फत जादा वाहतूक सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन ‘रा. प. महामंडळा’द्वारे करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0