मुंबई : एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात बुधवार, २६ मार्च रोजी रघुनाथ धोंडो कर्वे स्मृती व्याख्यानमाला संपन्न झाली. विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या वतीने ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.
हे वाचलंत का? - दिशा सालियान प्रकरण आणि आदित्य ठाकरेंची नार्कोटेस्ट! काय म्हणाले रामदास कदम?
विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. उज्वला चक्रदेव या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. तर प्रमुख अतिथी आणि वक्त्या म्हणून डॉ. रमा गोळवलकर उपस्थित होत्या. त्यांनी 'प्राचीन भारतीय विकास संकल्पना' या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे संचालक प्रा. डॉ. प्रभाकर चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या व्याख्यानमालेस विद्यार्थिनींसह शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.