नवी दिल्ली: ( Palghar Lok Sabha MP Hemant Sawra In Parliment ) पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. हेमंत सवरा यांनी लोकसभेत गरीब, ग्रामीण व आदिवासी बांधवांसाठी केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचे कौतुक करत प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाचा विशेष उल्लेख केला.
गरीब व आदिवासी समाजासाठी केंद्र सरकारच्या आरोग्यविषयक योजना वरदान ठरत आहेत. त्यामुळे संपूर्ण जनता सरकारच्या या योजनेची आभारी आहे," असे मा. सवरा यांनी सभागृहात सांगितले.
केंद्र सरकारने १९६१ आजारांच्या उपचारांचा समावेश विविध योजनांमध्ये केला आहे, परंतु कॅन्सर, हृदयविकार, अवयव प्रत्यारोपण यांसारख्या जटिल आणि खर्चिक आजारांसाठी अधिक सहाय्याची आवश्यकता आहे. त्यामुळे, सरकार "टॉप अप स्कीम" लागू करण्याचा विचार करत आहे का? असा महत्त्वाचा प्रश्न खासदार सवरा यांनी सभागृहात उपस्थित केला. गरीब रुग्णांना उत्तम वैद्यकीय उपचार मिळावे, यासाठी सरकार अधिक सकारात्मक पावले उचलेल, अशी आशा व्यक्त करत मा. हेमंत सवरा यांनी सरकारचे आभार मानले.
प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्री मा. जे. पी. नड्डा यांनी केंद्र सरकार आरोग्य सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करत असून, गरीब व गरजू रुग्णांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी नवनवीन उपाययोजना करत असल्याचे स्पष्ट केले.
केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी उत्तर देताना स्पष्ट केलेले मुद्दे
- आयुष्मान भारत योजना सुरू होताना ५० कोटी नागरिकांचा समावेश करण्यात आला होता.
- लोकसंख्येच्या वाढीचा विचार करून सामाजिक व आर्थिक जनगणना (SECC) डेटा आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) यासोबत योजनेची जोडणी करण्यात आली, त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या आता ६२ कोटींवर पोहोचली आहे.
- ही जगातील सर्वात मोठी आरोग्य कव्हरेज योजना आहे.
- महाराष्ट्र राज्यातील लाभार्थी संख्या १,३२,९२,६५० लोकांनी आतापर्यंत लाभ घेतला आहे.
- ७० वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला, त्यांच्या उत्पन्नाची कोणतीही अट नसताना, दरवर्षी ५ लाख रुपयांचे आरोग्य कव्हरेज मिळेल.
- सध्या १,९६० वैद्यकीय उपचार पद्धती (प्रोसीजर्स) या योजनेत समाविष्ट आहेत.
नवनवीन आजार व उपचार पद्धती समाविष्ट करण्यासाठी वेळोवेळी सुधारणा केली जाते,आणि भविष्यात अधिकाधिक गंभीर आजारांचा समावेश करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. ही योजना अधिक प्रभावी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, प्रत्येक गरजू नागरिकाला उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असा विश्वास आरोग्य मंत्री मा. जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला.