नवी दिल्ली : मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने रमजान महिन्याच्या अंतिम शुक्रवारी हाताला काळ्या पट्ट्या बांधून नमाज अदा करण्याचे आवाहन केले आहे. वक्फ विधेयकाचा निषेध करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि त्यात सर्वांनी वक्फ विधेयकाचा निषेध म्हणून हाताला काळी पट्टी बांधावी, असा दावा केला आहे.
दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आणि पाटण्यातील निषेध स्थळावर मुस्लिमांनी केलेल्या जोरदार निषेधामुळे भाजपच्या मित्र पक्षांमध्ये एकच खळबळ उडाली होती. २९ मार्च रोजी विजयवाडा येथे निषेध करण्यात आला. मशिदी, ईदगाह, मदरसे, दर्गे, खानकाह, कब्रिस्तान आणि इतर धार्मिक आणि सामाजिक संस्थांमधून बाहेर काढण्याचा एक कट आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास हजारो, मदरसे, कब्रिस्तान, दर्गे आपल्या हातून निसटतील, असा समज निर्माण झाल्याने मुस्लिम वक्फ विधेयकाला विरोध दर्शवत आहेत.
त्यानंतर त्यांनी पुढे लिहिले की, असंख्य मुस्लिमांनी मशिदीत जमा व्हावे आणि वक्फ विधेयक बिल लागू होवू नये, यासाठी शांतपणे नमाज अदा करत जुहातुलच्या दिवशी हाताला काळी पट्टी बांधावी. प्रत्येकाने आपला हक्काने राग, दु:ख व्यक्त करावा.
तामिळनाडू विधानसभेने वक्फ दुरूस्ती विधेयक २०२४ विरोधात ठराव मंजूर केला आहे. विधानसभेत बोलताना तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, वक्फ दुरूस्ती हे विधेयक मुस्लिमांच्या विरोधात आहे.त्यानंतर मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी भाजप सरकारला उद्देशून एक निरर्थक दावा केला की, केंद्र सरकार मुस्लिमांचे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मुस्लिमांच्या कल्याणाचा आणि हक्काचा विचार करत नसल्याचे बेताल वक्तव्य स्टॅलिन यांनी केले.