कोलकाता : प.बंगालमधील सत्ताधारी पक्षाच्या गुंडांनी बांगलादेश सीमां बंद करण्यासाठी अडचन निर्माण केली. ते सीमारक्षकांसोबत अरेरावी करण्याचा प्रयत्न करत होते. ममता बॅनर्जी यांच्या पक्षातील काही लोकांचाही यामध्ये समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. भारत-बांगलादेश सीमेवर आता प.बंगालच्याा धरतीवर तार कंपाऊंड करण्यास विरोध केला जात आहे. आमच्या हद्दीत तार कंपाऊंड करू नका, आम्ही तार कंपाऊंड करण्यासाठी कोणतीही एक परवानगी देणार नाही, असे गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत वक्तव्य केले आहे. गुरूवारी २७ मार्च २०२५ मध्ये लोकसभेत इमिग्रेशन अँड ओव्हरसीज बोर्डावर बोलताना बांगलादेश सीमेचा हा एक मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.
ते म्हणाले की, बांगलादेशसोबत जोडली गेलेली सीमा ही २१६ किमी आहे. ते १६५३ किमीचे कुंपण बांधत आहेत. उर्वरित ५६३ किमीपैकी ११२ किमीचे तार कंपाऊंड घालण्यात येत आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी विचारले की, नदी, नाले आणि धरणांमुळे या भागाला कुंपण घालता येत नाही. मला वाटते की ४५० किमी अजून शिल्लक आहे. गृह सचिवांनी बंगालच्या सचिवांसोबत ४५० किमीसाठी एकूण ७ बैठका घेतलेल्या आहेत, पण प.बंगालचे सरकार जमीन देण्यास तयार होत नाही, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.
गृहमंत्र्यांनी सांगितले की, जर ममता बॅनर्जी जमीन देत असतील तर सीमा बंद केली जाईल. घुसखोरांना मदत केल्याबद्दल गृहमंत्र्यांनी बंगाल सरकारलाही दोषी ठरवले आहे, ते म्हणाले की, जेव्हा बांगलादेशी किंवा रोहिंग्या घुसखोरी करत असत तेव्हा त्यांना आधार कार्ड कोणी दिले? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
बंगाल सरकारने आधार कार्ड प्रणाली सक्रिय केली तर घुसखोर भारतात प्रवेश करू शकणार नाहीत, असे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. गृहमंत्री अमित शाह ज्या विधेयकावर बोलत ते विधेयक गुरूवारी लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आले. यामुळे घुसखोरांवर नियंत्रण आणले जाईल.