कुणाल कामराला खार पोलिसांचे समन्स!

    28-Mar-2025
Total Views |

Khar police summons to Kunal Kamra
 
मुंबई : ( Khar police summons to Kunal Kamra ) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे सादर केल्याच्या प्रकरणात मुंबईच्या खार पोलिसांनी कॉमेडियन कुणाल कामरा याला चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
 
कामराला दि. ३१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कुणाल कामराने चौकशीसाठी दि. २ एप्रिल रोजीपर्यंत वेळ मागितली होती. मात्र, पोलिसांनी त्याला मुदतवाढ नाकारली आणि ठरलेल्या वेळीच उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
 
कुणाल कामरा याने संगीत कंपनी ‘टी-सीरिज’वर निशाणा साधला आहे. कामराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ’एक्स’वर लिहिले की, ‘टी-सीरिज’ने त्यांना कॉपीराईट उल्लंघनाची नोटीस पाठवली आहे.