मुंबई : दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नवा अँगल समोर आला आहे. दिशाच्या वडीलांचे बाहेर अफेअर असल्यामुळे तसेच आर्थिक तणावातून तिने आत्महत्या केल्याचे मालवण पोलिसांनी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.
८ जून २०२० रोजी एका इमारतीवरून काली पडून दिशा सालियानचा मृत्यू झाला. तिचे वडील सतीश सालियान यांनी याप्रकरणी पुन्हा एकदा न्यायालयात याचिका दाखल केली असून दिशावर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या झाल्याचा दावा केला आहे. तसेच याप्रकरणाची नव्याने चौकशी करण्याचीही मागणी केली आहे.
दरम्यान, आता दिशाच्या मृत्यूचा क्लोजर रिपोर्ट पुढे आला आहे. ४ फेब्रुवारी २०२१ रोजी मालवणी पोलिसांनी कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला. दिशा सालियानच्या वडिलांचे बाहेर अफेयर सुरु असून ते सातत्याने दिशाकडे पैसे मागत होते. त्यांना पैसे दिल्याने ती आर्थिक तणावात होती आणि यातूनच तिने आत्महत्या केल्याचे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. वडीलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल तिने मित्रांनादेखील सांगितले असल्याचे या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच कोरोनाची साथ असल्याने दिशाचे पोस्टमार्टम करण्यास उशीर झाल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता दिशा सालियान मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.