वृत्तपत्रविक्रेत्यांच्या स्टॉलविषयीचा प्रश्न लवकरच निकाली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    28-Mar-2025
Total Views |
 
Deputy Chief Minister Eknath Shinde on issue regarding newspaper vendor stalls
 
मुंबई: ( Deputy Chief Minister Eknath Shinde on issue regarding newspaper vendor stalls ) वृत्तपत्रविक्रेत्यांचा स्टॉलविषयीचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी संजय मोरे यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाशी सातत्याने केलेल्या संपर्कानंतर मुख्यमंत्र्यांनी वृत्तपत्रविक्रेत्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
 
बुधवार, दि. २६ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणेस्थित ‘मुक्तागिरी‘ बंगला येथे वृत्तपत्रविक्रेत्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी “वृत्तपत्रविक्रेत्यांचा स्टॉलविषयीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल. शिवाय, ठाणे महानगरपालिकेच्या धर्तीवर मुंबईतील विक्रेत्यांना कायमस्वरूपी स्टॉल मिळून देऊ,” असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
 
यावेळी दक्षिण मुंबईसह इतर विभागांतील वृत्तपत्रविक्रेत्यांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला. विश्वस्त सुरेश पाटील, राजन पेंढूरकर, दीपक गवळी, विजय मोरे, अनिल पिसाळ, पंडित, ‘ठाणे असोसिएशन’चे दत्ता घाडगे, बंटी म्हात्रे, डिचोलकर व इतर असे सर्व विभागांतून जवळजवळ २५० ते ३०० विक्रेते यावेळी उपस्थित होते. “उपमुख्यमंत्र्यांशी स्टॉलविषयी सतत पाठपुरावा करून स्टॉलचा विषय मार्गी लावणारच,” असे आश्वासन जयवंत डफळे आणि प्रकाश कानडे यांनी दिले.