पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात सांप्रदायिक हिंसा, इस्लामी ध्वज घेत हिंदूंच्या दुकानांना केले लक्ष्य

    28-Mar-2025
Total Views |
 
target Hindu shop
 
कोलकाता : प. बंगालमधील मालदा जिल्ह्यातल मोथाबाडी परिसरात गुरूवारी २१ मार्च २०२५ रोजी सांप्रदायिक हिंसा झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाला घेऊन अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत हल्लेखोरांनी रस्त्यावर उतरत कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे. आरोप आहे की, मुस्लिमांनी हिंदूंच्या दुकानांना लक्ष्य केले आहे.
 
हिंसेची माहिती देत असताना भाजपचे नेता सुवेंदु अधिकाऱी यांनी राज्यपाल सीवी आनंद बोस यांना पत्र लिहिले होते. या पत्रात राज्य सरकारने निर्देश देण्याची मागणी केली आहे. मोथाबारी परिसरातील हिंदूंच्या सुरक्षेला घेऊन CAPF तैनात करण्यात आले आहेत. यावेळी सुवेंदु अधिकाऱी यांना दावा केला की, संबंधित परिसरात हिंदूंचा धोका वाढत चाललेला आहे. त्यांच्या सरक्षेसाठी मोठे पाऊल उचलणे गरजेचे आहे.
 
 
 
भाजपचे आमदार सुवेंदु अधिकारी यांनी सोशल मीडियावरील ‘X’ प्लॅटफॉर्मवर काही व्हिडिओ शेअर केले. त्यांनी आरोप केला की, मोथाबाडीमध्ये हिंदूंच्या दुकानांवर लक्ष्य करण्यात आले. यावेळी भाजप नेता, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले की, दुपारी १ वाजल्यापासून हल्ल्याला सुरूवात झाली होती.
 
केंद्रीय शिक्षण आणि उत्तर-पूर्व क्षेत्र विकास राज्यमंत्री डॉक्टर सुकांत मजूमदारने या घटनेचे व्हिडिओ शेअर करत लिहिले की, मालदामधील मोथाबाडीत भितीचे वातावरण आहे. हिंदूंच्या दुकानांना लक्ष्य करण्यात आले आहे. त्यानंतर जमावाने हल्ला करत कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच ममता बॅनर्जी आणि त्यांची पोलीस कुठे आहे? त्यांचे तुष्टीकरण राजकीय किंमत असून भीती, हिंदूंसोबत अन्याय.
 
सुकांत मजूमदारकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओत सांगण्यात आले की दुकानांमध्ये तोडफोड सुरू आहे. हल्लेखोरांच्या हातात इस्लामी झेंडे आहेत.