बांगलादेशने पैसे देताच अदानींनी वीज पुरवठा पुन्हा सुरू केला

    28-Mar-2025
Total Views |
 
Adani resumes powe
 
नवी दिल्ली : बांगलादेशने अदानी पॉवरची थकबाकी न भरल्याने बांगलादेशचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र आता अदानी पॉवरने बांगलादेशला वीजपुरवठा पुन्हा सुरू केला आहे. बांगलादेशने आपल्यावर असलेली थकबाकी भरण्यास सुरूवात केल्यानंतर गोड्डामधील अदानी पॉवरच्या दोन्ही प्रकल्पांनी वीज पुरवठा सुरू केला आहे. २७ मार्च रोजी, बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाचे अध्यक्ष रेजाउल करीम यांनी वीजपुरवठा पुन्हा एकदा सुरू केला असल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर ते म्हणाले की, आम्ही अदानींना नियमितपणे पैसे देत आहोत आणि आमच्या गरजेनुसार वीज पुरवठा केला जात आहे.
 
अहवालानुसार, अदानी पॉवरला बांगलादेशकडून नियमितपणे ९० दशलक्ष डॉलर दिले जात आहेत. या रकमेत सध्याच्या वापरासाठी दयेयकेही समाविष्ट करण्यात आली आहेत. एका वृत्तपत्रानुसार, बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाने अदानीच्या कर्जदारांना आश्वासन देण्यासाठी आणि कंपनीच्या रोखीची कमतरता कमी करण्यास मदतीसाठी हमी दिली होती.
 
फेब्रुवारीमध्ये, मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशातील अंतरिम सरकारने अदानी पॉवरला झारखंडमधील त्यांच्या वीज पुरवठ्याच्या प्लांटमधून पूर्ण पुरवठा पुन्हा सुरू करण्याची विनंती केली आहे. झारखंडमध्ये १६०० मेगावॅटचा प्रकल्प चालवण्यात येतो. २०१७ मध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी झालेल्या करारानुसार, बांगलादेशला केवळ वीजपुरवठा करण्यात येत आहे.
 
गेल्या १ नोव्हेंबर रोजी अदानी पॉवरने त्यांच्या २ अब्ज डॉलर्सच्या प्लांटचा एक युनिट बंद करण्यात आला आहे. बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बॉर्डाने भारतीय समूहाला वीजपुरवठा पूर्ण करण्याची विनंती केली आणि प्रलंबित थकबाकी फेडण्यासाठी ते दरमहा ८५ दशलक्ष देत असल्याचे सांगितले जात आहे.