दिशा सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंनी बोलणं टाळलं! म्हणाले, "त्या विषयावर..."

27 Mar 2025 13:25:41
 
Uddhav Thackeray Disha Salian
 
मुंबई : (Uddhav Thackeray) राज्यभरात सध्या दिशा सालियान मृत्यू प्रकरण चर्चेत असून यात उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरेंचे नाव पुढे आले आहे. दरम्यान, आता उद्धव ठाकरेंनी माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असे सांगत यावर प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
 
दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी दिशा सालियानची हत्या झाल्याचा आरोप करत न्यायालयात या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दिशाचा मृत्यू आत्महत्या नसून तिचा बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप सतीश सालियान यांनी केला आहे. तसेच तत्कालिन उद्धव ठाकरे सरकारने हे प्रकरण दाबले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
 
हे वाचलंत का? - होय, आम्हीच संतोष देशमुखांचे मारेकरी! सुदर्शन घुलेसह आरोपींची मोठी कबुली; नेमकं काय म्हणाले?
 
गुरुवार, २७ मार्च रोजी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना दिशा सालियान प्रकरणी प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, "दिशा सालियानप्रकरणाशी माझा संबंध नाही. या विषयाबद्दल माझ्याकडे काहीही माहिती नाही. त्यामुळे त्या विषयावर मी बोलत नाही," असे म्हणत त्यांनी यावर प्रतिक्रिया देणे टाळले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0