लखनऊ : उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील वादाच्या भोवऱ्यात असलेल्या जामा मशिदीचे प्रमुख जफर अलीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. पोलिसांनी केस डायरी सादर करेपर्यंत जामीन मंजूर करावा, असा वकिलाने न्यायालयात युक्तीवाद सादर केला आहे. वकिलाचे नाव हरिओम प्रकाश सैनी असून त्यांनी हा युक्तीवाद केला आहे. शिवाय, जामा मशिदीचे प्रमुख आणि वकील असल्याने त्यांनी न्यायालयात जमीन मागितला आहे.
न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली असून आता या प्रकरणातील पुढील सुनावणीची तारीख आता समोर आली आहे. २ एप्रिल ही पुढील सुनावणीची तारीख असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी न्यायालयाने असा युक्तीवाद केला आहे की, जफरवर जमावाला भडकावणे, समाजात तेढ निर्माण करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसाण करणे आणि पोलिसांचे वाहन जाळणे अशी अनेक गंभीर आरोप करण्यात आली आहेत.
संबंधित प्रकरणी पोलिसांनी आरोप केला की, जफर अली यांनी खोटी तथ्ये दिली आहेत. पोलिसांनी सांगितले की, हे गंभीर कृत्य करण्यात आले आहे आणि त्यामुळे जामीन मंजूर करू नये. जफर अलीवर संभलमधील हिंसाचाराचा कट रचण्याचा आणि पोलिसांना खुनी म्हणण्याचा आरोप करण्यात आला आहे.
अशातच आता जफर अलीने दावा केली की, पोलिसांनी संभलमध्ये ४ जणांना ठार मारले होते. या प्रकरणात पोलिसांनी खऱ्या खुन्यांना याआधीच ताब्यात घेतलेल होते.