नाशिक जिल्ह्यातील १८१ बांग्लादेशी 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' योजनेचे लाभार्थी! किरीट सोमय्यांकडून गुन्हा दाखल

27 Mar 2025 12:13:23
 
Kirit Somaiyya
 
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील १८१ बांग्लादेशींनी 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' योजनेचा लाभ घेतल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुढे आणली होती. दरम्यान, आता या बांग्लादेशींविरोधात बुधवार, २६ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
नाशिक येथील कळवण तालुक्यातील भादवण गावातील १८१ बांग्लादेशींनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ घेतला. त्यांनी आपण भादवण गावचे रहिवाशी असल्याचे दाखवत लाभ घेतला होता. दरम्यान, त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम ४१७, ४६५, ४६८ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६ (D) अंतर्गत किरीट सोमय्या यांनी कळवण पोलिस ठाण्यात दिनांक ७ मार्च रोजी तक्रार दाखल केली होती.
 
सुक्तारा खातुन, नजमुल हक, तस्लीमा खातुन, इंताब, मोहंमद हजरत, मोहम्मद रशिद आलम, अनिसा, अन्वरा, साहुद राजा, सलाम अली, अफीफा खातुन, इशरत जहाँ, जुलेखा बीबी, अख्तर हुसैन, मोहम्मद हनिफ, खुशबू, मोहम्मद मंजरुल आलम, ताहेर आलम, सरीना खातुन यांच्यासह अनेक जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0