इफ्तार नाही! 'फलाहार पार्टी' देणार दिल्ली सरकार

पहिल्यांदाच भव्य स्तरावर हिंदू नववर्ष साजरे होणार

    27-Mar-2025   
Total Views |

Hindu Nava Varsh celebration in Delhi

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Hindu Nava Varsh celebration in Delhi)
दिल्लीतील रेखा गुप्ता सरकारने रमजानच्या काळात होणाऱ्या इफ्तार पार्टीच्या धर्तीवर फलाहार पार्टी आयोजित करण्याचे योजीले आहे. दिल्ली सरकार पुढील दोन आठवडे हिंदू नववर्ष साजरे करणार असल्याची माहिती आहे. म्हणजेच ३० मार्च रोजी हिंदू नववर्षानिमित्त विधानभवन परिसरात संध्याकाळी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांपासून त्याची सुरुवात होईल आणि १४ एप्रिल आंबेडकर जयंतीला त्याची सांगता होईल. दिल्लीतील हजारो नागरिक या उत्सवात सहभागी होतील. विशेष म्हणजे कला आणि संस्कृती मंत्रालयच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

हे वाचलंत का? : गिरणगावच्या हिंदू नववर्ष शोभायात्रेत 'मराठी भाषेचा जागर'


पहिल्यांदाच दिल्लीत हिंदू नववर्ष आणि चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने उत्सवाचे वातावरण तयार होणार आहे. ३० मार्च रोजी दिल्ली विधानसभेत कैलाश खेर यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासह, विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता तसेच दिल्ली सरकारचे मंत्री आणि इतर भाजप नेते सहभागी होणार आहेत.

यापूर्वी दिल्ली सरकारने उर्दू अकादमीच्या सहकार्याने इफ्तार पार्ट्यांचे आयोजन केले होते, परंतु रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वातील सरकार पहिल्यांदाच 'फलाहार पार्टी' आयोजित करणार आहे. यंदा चैत्र नवरात्री ३० ते ७ एप्रिल पर्यंत असणार आहे. या काळात दुर्गा देवीची उपासना केली जाते. याच काळात दिल्ली सरकारकडून फलाहार पार्टी नागरिकांना देण्यात येईल. हा तीन दिवसांचा कार्यक्रम असेल, जो सप्तमी, अष्टमी आणि नवमीच्या दिवशी होईल. अशी माहिती आहे की, मधल्या काळात हनुमान जयंती आणि रामनवमीचे कार्यक्रमही आयोजित केले जातील.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक