उद्योगपती रतन टाटा यांना ‘भारतरत्न’ द्या

आ. उमा खापरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

    27-Mar-2025
Total Views |
 
 
Give Bharat Ratna to industrialist Ratan Tata MLC uma khapre to CM
 
मुंबई: ( Give Bharat Ratna to industrialist Ratan Tata MLC uma khapre to CM ) उद्योगपती रतन टाटा यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार द्या, अशा मागणीचे पत्र आ. उमा खापरे यांनी मंगळवार, 25 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
 
आ. उमा खापरे हातात रतन टाटा यांची प्रतिमा घेऊन विधानभवनात दाखल झाल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, “टाटा समूहाचे सर्वेसर्वा दिवंगत रतन टाटा यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये जयदीप खापरे आणि त्यांच्या टीमने त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा, यासाठी सह्यांची मोहीम घेतली होती.
 
टाटा समूहाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडमधील हजारो तरुणांना रोजगार मिळाला आणि पिंपरी-चिंचवडचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र देणार असून रतन टाटा यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची मागणी करणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचा हा प्रस्ताव मान्य करतील, अशी मला आशा आहे.
 
सावित्रीबाईंमुळेच आज मी इथे उभी
 
“महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ मिळालाच पाहिजे. सावित्रीबाईंमुळेच आज मी इथे उभी आहे. प्रचंड त्रास सहन करून त्या झगडल्या म्हणून आम्ही आज इथे आहोत. त्यामुळे त्यांनादेखील ‘भारतरत्न’ मिळावा,“ अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.