भाजप मुस्लिम विरोधी नाही; पाकिस्तानचा झेंडा फिरवणाऱ्यांच्या विरोधात !

27 Mar 2025 17:27:55
 
Chandrashekhar Bawankule on UBT
 
नागपूर: ( Chandrashekhar Bawankule on UBT ) भारतीय जनता पार्टी मुस्लिम विरोधी नाही; तर भारतात राहून पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरणाऱ्या लोकांच्या विरोधात असल्याचे ठाम मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडले.
 
 हिंदू मुस्लिम एकोप्याचे नाते
 
बावनकुळे प्रसारमाध्यमाशी बोलत होते. ते म्हणाले," उद्धव ठाकरेंच्या नाशिक आणि परभणीच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकत होते. त्या विरोधात आमची भूमिका आहे. पाकिस्तान क्रिकेट सामना जिंकल्यानंतर भारतात राहून फटाके फोडणारे जे लोक आहेत, त्यांना आमचा विरोध आहे. सर्वच मुस्लिम हे विरोधी नाहीतच. राज्यात हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये एकोप्याचे नाते आहे. आम्ही सर्वांना सोबत घेऊन जात आहोत.
 
ठाकरेंनी टीकेपेक्षा पक्ष वाढवावा
 
उद्धव ठाकरे यांना पुढील भविष्य दिसत नाही, म्हणूनच ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतात, असे सांगून ते म्हणाले," उद्धव ठाकरे यांनी टीका करण्यापेक्षा महाराष्ट्रात त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी काम करावे. लोकसभेनंतर आम्ही पक्ष वाढवण्यासाठी जनतेमध्ये जात आहोत , तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षाच्या बाहेर पडत आहे. अनेक लोक सोडून गेले आहे. त्यांच्यासोबत आता जे काही कार्यकर्ते उरले आहेत, ते सांभाळण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोलण्यापेक्षा त्यांनी आपला कार्यकर्ता पक्ष का सोडत आहे, याचा विचार केला पाहिजे.
 
सामाजिक बंधुभाव वाढण्यासाठी
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रमजान ईदच्या सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चाच्यावतीने देशभरात ‘सौगत-ए-मोदी’ हा रमजानच्या निमित्ताने कार्यक्रम राबविणार आहे. यातून बंधुभाव,एकता, सद्भाव वाढीस लागते. सामाजिक सौहार्द वाढते. आम्ही समाजात शांतता रहावी, देश मजबूत व्हावा याचा विचार करतो.
 
 
Powered By Sangraha 9.0