कुणाल कामरा प्रकरणी योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणालाही..."

26 Mar 2025 13:12:41

yogi adityanath on kunal kamra controversy
 
मुंबई : (Yogi Adityanath on Kunal kamra Controversy) स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं बनवून शोमध्ये सादर केल्याप्रकरणी मोठा वाद निर्माण झाला आहे. यावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे कोणालाही वैयक्तिक लक्ष्य करण्यासाठी असू शकत नाही', अशी परखड भूमिका मांडली आहे.
 
काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
 
"अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे दुसऱ्या व्यक्तीवर वैयक्तिक हल्ला करण्यासाठी असू शकत नाही. हे अतिशय दुर्दैवी आहे की, काही लोक या देशाचे चीर हरण करण्यासाठी, देशात आणखी फूट पाडण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करणे, हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार समजत आहेत", अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.
 
दरम्यान, कुणाल कामराविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, कुणाल कामराला समन्सही बजावले आहे. कुणाला कामराला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, त्याने आठ दिवसांचा वेळ मागितला असून खार पोलिसांना त्यांने यासंदर्भातील पत्र पाठवले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0