म्हणे, छ. संभाजी महाराजांची शिक्षा मनुस्मृतीनुसार!
26-Mar-2025
Total Views |
नागपूर : ( husain dalwai say abaout Chatrapati Sambhaji Maharaj ) नागपूर हिंसाचारप्रकरणी परिस्थितीची पाहणी करण्याकरिता गेलेले काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी “औरंगजेबाने शंभूराजेंना मनुस्मृतीप्रमाणे मारले,” असा अजब दावा करत आपल्या अकलेच्या दिवाळखोरीचे दर्शन घडविले आहे.
हुसेन दलवाई म्हणाले की, “औरंग्याने छत्रपती संभाजी महाराज यांना ज्या पद्धतीने मारले, ती क्रूरता होती. त्याने आपल्या भावाला म्हणजे दाराशिकोहला जसे मारले, त्याच पद्धतीने संभाजी महाराजांनाही मारले. शंभूराजेंना मारण्याचा आदेश दिल्यानंतर पंडितांनी मनुस्मृतीप्रमाणे त्यांना मारण्यात यावे, असे सांगितले,” असे विधान दलवाई यांनी केले आहे. “इतिहासाचा हा पैलू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मान्य करतील का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
हा तर दलवाईंचा जावईशोध!
हुसेन दलवाई यांनी औरंगजेबाच्या क्रूरतेमागे ‘ब्राह्मणी अँगल’ घुसविण्याचा जावईशोध जो लावला, तो केविलवाणा वाटतो. सर्वाधिक इस्लाम धर्मांतर करणारा मंदिरे तोडणारा, जिझिया कर लावणारा मुघल बादशाह शिक्षा देण्यासाठी पंडितांचे ऐकून काही करत असेल? इतकीच जर मनुस्मृती आवडली असती, तर त्याचे शुद्धीकरण करून औरंग्याचा ‘अरुण’ झाला नसता का?
- अमित नायकवडी, इतिहास अभ्यासक, मुंबई
मुस्लिमांनी नागपूरमध्ये केलेला उपद्रव झाकण्याचा प्रयत्न
संभाजी महाराजांच्या मृत्यूचा आणि मनुस्मृतीचा कोणताही ऐतिहासिक संदर्भ नसताना जाणूनबुजून अशा प्रकारचे वक्तव्य करून नागपूर दंगलीचा मुख्य मुद्दा भरकटवण्याचा दलवाई यांचा हा प्रयत्न आहे. तथाकथित पुरोगामी म्हणून मनुस्मृतीचे नाव चर्चेत आणायचे आणि हिंदूंमध्ये जातीय द्वेष पसरवायचा याची सुपारी काँग्रेसने पूर्वीपासून घेतली आहे.
- आशिष यादव, भाजप पश्चिम महाराष्ट्र आघाडी विधानसभा संयोजक