लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी १०० मुस्लिम कुटुंबियांमुळे ५० हिंदू सुरक्षित नाहीत. त्यांनी सांगितले की, वक्फ बिलमुळे मुस्लिम समाजालाही मोठा फायदा होईल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक व्यक्तीसाठी कायद्याची अंमलबजावणी करतच शिकवण दिली जाईल. त्यांनी बुधवारी २६ मार्च २०२५ रोजी एका पॉडकास्टदरम्यान त्यांनी वक्तव्य केले आहे.
योगी म्हणाले की. १०० हिंदू कुटुंबियांत एक मुस्लिम कुटुंब सर्वाधिक सुरक्षित आहे. त्यांना सर्वच धर्मांचे पालन करण्याचे स्वतंत्र्य असेल. मात्र १०० मुस्लिम कुटुंबीयांमध्ये ५० हिंदू सुरक्षित असू शकतात का ? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. अशातच आता बांगलादेश हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. याआधी पाकिस्तान हे याचे उदाहणर होते. आता अफगानिस्तानात काय झाले? याच गोष्टी आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आपल्याला याआधीच सावधान होणे गरजेचे आहे. याच घडलेल्या घटनांवर आणि वास्तवावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यांनी सांगितले की त्यांचा सर्वांसोबतच चांगला व्यवहार होता.
त्यानंतर ते म्हणाले की, उत्तर प्रदेशच्या मुस्लिमांच्या सुरक्षेवर भाष्य करण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातील मुस्लिम समाज सुरक्षित आहे. जर हिंदू सुरक्षित तर मुस्लिमही सुरक्षित आहेत. अशातच २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात अनेकदा हल्ले झाले होते. त्यावेळी हिंदूंची दुकाने जळून खाक झाली होती. हिंदूंची दुकाने जळत होती, तर मुस्लिमांची घरे जाळण्यात आली होती. २०१७ नंतर दंगली बंद होऊ लागल्या होत्या असे योगी आदित्यनाथ म्हणाले होते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, मी एक साधारण नागरिक असून उत्तर प्रदेशचा असून मी योगी आहे. सर्वांच्या आनंदाचे हित साधत आहे. मी सर्वांसोबत विकासावर विश्वास करत आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.