मंगला मिरवणुकीदरम्यान कट्टरपंथीयांकडून दगडफेक, दोन्ही समुदायांमध्ये संघर्ष उफाळला

26 Mar 2025 14:27:21

Mangala Mirvnuk
 
रांची : झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात मंगला मिरवणूक काढण्यात आली होती. या दरम्यान, दोन समुदयांमध्ये संघर्ष उफाळून आल्याची घटना घडली आहे. यावेळी त्यांनी एकमेकांवर दमगडफेक केली होती. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत हजारीबागचे एसपी घटनास्थळी होते आणि त्यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहनही केले आहे. ही घटना २५ मार्च रोजी मंगळवारी राूत्री घडली असल्याची माहिती आहे.
 
मंगला मिरवणूक काढण्यात आली असताना झंडा चौक जामा मशीद रोडवर दोन समुदायांमध्ये हाणामारी झाली आहे. अशा परिस्थितीत कट्टरपंथीयांनी मंगला मिरवणुकीवर दगडफेक केली. मात्र, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असताच, हजारो लोक हे घटनास्थळी दाखल झाले.
 
 
 
घडलेल्या घटनेची परिस्थिती लक्षात घेता, हजारीबागचे एसपी अरविंद कुमार सिंहांसोबत इतर पोलीस अधिकारी आणि मोठ्या संख्येने सैन्य तैन्यात करण्यात आले आहेत. गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी हवेत पाच राऊंड गोळीबार केला असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचवेळी रामनवमी महासभेचे सदस्य, स्थानिक प्रशासन आणि इतर लोक परिस्थिती नियंत्रित आणण्याबाबत व्यस्त होते.
 
दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष झाला असून सध्याची परिस्थिती ही निंयंत्रणात आहे. लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच लक्षही देवू नये असे आवाहन करण्यात आले आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, या घटनेत सहभागी असलेल्या लोकांविरूद्ध एफआरआय दाखल करण्यात आली असल्याची माहिती एसपी अरविंद सिंह यांनी दिली आहे.
 
Powered By Sangraha 9.0