वाल्मिक कराडच्या वकिलांकडून आरोपनिश्चिती करण्यास विरोध, सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं?

26 Mar 2025 15:06:37
 
Santosh Deshmukh Case Hearing Updates Adv. Ujjwal Nikam
 
बीड : ( Santosh Deshmukh Case Hearing Updates ) संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या सत्र न्यायालयात २६ मार्चला रोजी सुनावणी पार पडली. या प्रकरणातील आरोपींना व्हिडिओ कॅान्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीसाठी बीड सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. जिल्हा न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्यासमोर युक्तिवाद करताना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Adv. Ujjwal Nikam) यांनी केस आरोपनिश्चितीसाठी तयार असल्याचे म्हटले. यावर आरोपींच्या वकीलांनी युक्तिवाद करत आरोपनिश्चितीस विरोध दर्शवला आहे.
 
कराडच्या वकिलांकडून आरोपनिश्चिती करण्यास विरोध
 
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ही केस आरोपनिश्चिती साठी तयार असल्याचे न्यायालायासमोर सांगितले. मात्र, आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद करताना त्यांना कागदपत्रे न मिळाल्यामुळे आरोपनिश्चिती न करण्याची मागणी केली. यावर आता न्यायालयाचा निर्णय काय असणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या खटल्याची आजची सुनावणी संपली असून पुढील सुनावणी १० एप्रिलला होणार आहे.
 
सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी मागणी केलेली गोपनीय कागदपत्रे आणि साहित्य त्यांना पुरवण्यात आले आहे. याचबरोबर आरोपींचे जबाब, सीसीटीव्ही फुटेजेस, काही इलेक्ट्रॅानिक पुरावे, सीडीआर कॅापी असे महत्त्वाचे साहित्या आरोपींच्या वकिलांना देण्यात आले आहे. आरोपींचे कबुलीजबाब असल्यास तेही आरोपींच्या वकिलांना दिले जाणार होते.
 
 
Powered By Sangraha 9.0