मुंबई: ( RSS official Dattatreya Hosabale in Dadar on Ram Navami ) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्ष जयंतीनिमित्त गेल्या वर्षभरात विविध कार्यक्रमांतून त्यांचे प्रेरणादायी चरित्र आणि अलौकिक योगदानाला उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याच मालेतील एक प्रकट कार्यक्रम ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारोह समिती’, मुंबई महानगराच्यावतीने दादरमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
रविवार, दि. ६ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजता राजा शिवाजी विद्यालय प्रांगण, दादर (पूर्व) येथे हा कार्यक्रम होत असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असतील. तसेच प्रमुख अतिथी म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज उदयराजे होळकरदेखील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.