प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी

26 Mar 2025 11:57:21
 
Prashant Koratkar in police custody
 
 
कोल्हापूर : ( Prashant Koratkar in police custody ) छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याने अटक करण्यात आलेला आरोपी प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर न्यायालयाने मंगळवार, दि. २५ मार्च रोजी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. “आरोपी प्रशांत कोरटकर याने त्याच्या मोबाईलमधील डेटा डिलिट केला आहे. असे त्याने का केले, तसेच हा आरोपी एक महिना फरार होता. या काळात त्याला कोणी मदत केली, याचादेखील तपास करणे गरजेचे आहे,” असा दावा सरकारी वकील यांनी न्यायालयात केला होता.
 
“त्यामुळे आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, तसेच आरोपीच्या आवाजाचे नमुने घ्यायचे आहेत. त्यासाठी न्यायालयाला ऑर्डर करावी लागेल. त्यामुळे तसे आदेश द्यावे,” अशी मागणीदेखील सरकारी वकील यांनी केली होती. त्यानंतर न्यायालयाच्यावतीने कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0