न्यायाधीश वर्मा नोटकांडामुळे न्यायिक नियुक्ती आयोग पुन्हा केंद्रस्थानी

    26-Mar-2025
Total Views |

नवी दिल्ली
नवी दिल्ली : राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाविषयी (एनजेएसी) राज्यसभेचे सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते व अन्य नेत्यांसोबत यां अतिशय सकारात्मक संवाद झाला, अशी माहिती उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी सभागृहास बुधवारी दिली.
न्यायधीश वर्मा नोटकांडाचे पडसाद संसदेतही उमटले आहेत. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी राज्यसभेचे सभागृह नेते आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा, विरेधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह सर्व पक्षांच्या गटनेत्यांना निमंत्रित केले होते. त्याची माहिती उपराष्ट्रपती धनखड यांमनी बुधवारी सभागृहास दिली. ते म्हणाले, जनतेच्या मनात चिंता उत्पन्न करणाऱ्या मुद्द्यावर अतिशय फलदायी संवाद झाला. सभागृह नेते आणि विरोधी पक्ष नेते यांच्यासह राजकीय पक्षांच्या नेत्यांची उपस्थित होती. यावेळी चर्चेमध्ये चिंता आणि सहकार्याची भावना होती, असे ते म्हणाले.
कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि न्यायपालिका एकमेकांच्या विरोधात असण्याचा प्रश्नच नसल्याचे उपराष्ट्रपतींनी सांगितले. ते पुढे म्हणाले, देशातील सर्व संस्थांना एकत्रितपणे, एकत्रितपणे काम करावे लागते. त्यासाठी सद्हेतूने नियंत्रण आणि संतुलनदेखील आवश्यक असते. सभागृह नेते आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते दोघांनीही आपापल्या पक्षांशी या विषयावर चर्चा करून पुढील चर्चा करण्यासाठी येण्याचे मान्य केले आहे, असेही उपराष्ट्रपतींनी नमूद केले आहे.