लखनऊ : उत्तर प्रदेशातील मेरठमधील एका पोलीस ठाण्यात इफ्तार पार्टी (Iftar Party) आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी या आयोजित पार्टीबद्दल विपिन ताडा यांनी पोलीस ठाण्याच्या प्रभारींना निलंबित केले आहे. १७ मार्च रोजी, एसएसपी डॉ. विपिन ताडा यांनी लोहियानगरमधील झाकीर कॉलनी पोलीस ठाणे बांधण्यात आलेल्या इमारतीचे रिबीन कापून उद्घाटन केले आहे. यानंतर आता सायंकाळी चौकीचे प्रमुख शैलेंद्र प्रताप यांनी परवानगीशिवाय चौकीवर इफ्तारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
संबंधित कार्यक्रमाचा व्हिडिओ मंगळवारी इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. व्हिडिओची दखल घेत, एसएसपींनी तात्काळ प्रभावाने चौकीच्या प्रभारींना लाईन ड्युटीवर नेमले आहे.
यावेळी पोलिसांनी रस्त्यावर ईद-उल-फित्रची नमाज अदा करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. एफआरआयसोबत आरोपीचे पासपोर्ट रद्द करण्याबाबतचा अहवाल आता दिला जाणार आहे. जेणेकरून तो मक्का आणि मदिनामध्ये प्रवास करू शकणार नाही. त्यामुळे ईदगाहसमोरील रस्त्यावर नमाज अदा करू नये असे सर्वांना स्पष्ट करण्यात आले आहे.
जवळच्या मशिदीमध्ये नमाज अदा करावी आणि गेल्या इतर वर्षी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमधील आरोपीचे पासपोर्टही रद्द करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी संबंधित अहवालात नमूद केली आहे. गेल्या वर्षी नमाज अदा केल्यानंतर आता अनेक लोक कामासाठी परदेशात गेले असता काही लोक उमराहसाठी गेले होते.
या इफ्तार पार्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात एक पोलीस अधिकारी हा इफ्तार पार्टीसाठी लागणारे जेवन बनवताना दिसत होता. यानंतर, एसएसपी विपिन ताडा यांनी शैलेंद्र गुप्ता यांना लाईन ड्युटीवर ठेवले.