त्रिपुरात बांगलादेशी घुसखोरांच्या आवळल्या मुसक्या, सहा बांगलादेशी घुसखोरांना दोन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा

    26-Mar-2025
Total Views |
 
Bangladeshi
 
त्रिपुरा : बांगलादेशी घुसखोरांना तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना त्रिपुरामध्ये  मंगळवारी २५ मार्च २०२५ रोजी गोमाती जिल्ह्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश न्यायालयाने सौम्या खातून, तस्लीम बिस्वास, सलिना बेगम, रीमॅन बेगम, अब्दुल रहीम शेख आणि अस्लम भुईया या एकूण सहा बांगलादेशी घुसखोरांना दोन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 
 
एका प्रसारमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, अवैधपणे त्रिपुरात घुसखोरी केली होती. याचपार्श्वभूमीवर न्यायालयाने फॉरेन्सिक कायद्याच्या कलमाअंतर्गत १४ (ए) अन्वये प्रत्येकी २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याचा जामीन मंजूर केला जाणार असल्याची माहिती समोर आली. मात्र, त्यांनी ही रक्कम भरली नाहीतर त्यांना दोन महिने संबंधित गुन्ह्यच्या पार्श्वभूमीवर दोन महिने कठोऱ शिक्षा भोगावी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
त्रिपुरा पोलिसांनी सांगितले की. सिलचरी पोलीस ठाण्याचे एएसआय दयाल देववर्मा यांनी या प्रकरणात खोलवर तपास केला आहे. तसेच चार्जशीटही दाखल करण्यात आली आहे. अशातच त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. या व्यतिरिक्त आयपीपी अॅक्ट सेक्शन नुसार१० हजार रुपये रक्कम शिक्षा म्हणून भरावी लागणार असून तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. जर दंड भरला नाही तर आणखी एक महिना तुरुंगवास भोगावा लागेल.
 
अशातच याआधी १५ मार्च २०२५ रोजी उनकोटि जिल्ह्यात ३ रोहिंगे घुसखोऱ्यांना २-२ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रोहिंगे बांगलादेशच्या सीमेवरूनच भारतात घुसखोरी करत आहेत.