बाप म्हणावं की सैतान? मुस्लिम युवतीने हिंदू युवकाशी प्रेमसंबंध ठेवल्याने अब्बाने अनेकदा जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न

युवतीने

    26-Mar-2025
Total Views |
 
Hindu
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये राजेश आणि कुलसुम या मुस्लिम युवतीने हिंदू परंपरेनुसार विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कुलसुमने आपल्या हिंदू प्रियकर राजेशसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर कुलसुमने विवाह करत तिने हिंदू धर्म स्वीकारल्याचे सांगितले. कुलसुमने धर्मपरिवर्तन करत ममता झाली आहे. तिने आपल्या कुटुंबाला धोका असल्याची माहिती दिली आहे. कुलसुम म्हणाली होती की. तिच्या वडिलांनी तिला अनेकदा जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता.
 
दरम्यान, जोडप्यांच्या प्रेमाची सुरूवात ही दोन वर्षांआधी सुरू झाली होती. मूळ गाव आवळामधील रहिवासी असलेला निवासी राजेश दिल्लीत दिल्लीमध्ये शिवणकाम म्हणजेच टेरलिंगचे काम करत होता. कुलसुम उर्फ ममता आणि राजेश एकमेकांसोबत काम करत होते. दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. या संबंधित प्रकरणाची माहिती कुलसुमच्या कुटुंबियांना झाली होती.
 
कुलसुमच्या आई-वडीलांना हिंदू युवकासोबत नातेसंबंध ठेवणे आणि विवाह करणे पसंत नव्हते. त्यामुळे त्याचा विरोध करण्यात आला आहे. कुलसुमने दिलेल्या माहितीनुसार, तिचे वडील तिला रोजच या मुद्द्यावरून ओरडत, तिचा छळ करत असत. मात्र तिने कोणाचेही न ऐकता तिने आपल्या प्रेमाखातर राजेशसोबत विवाह करण्यासाठी हिंदू धर्म स्वीकारला.
 
त्यांनी हिंदू परंपरेनुसार बरेलीत साधू संतांच्या आशीर्वादाने बरेलीतील अगस्त्य मुनी आश्रमात दोन्ही जोडप्यांचा विवाह करण्यात आला. आश्रमचे असलेले साधू म्हणाले की, मुलगी प्रौढ असून तिने धर्म स्वीकारण्याचा घेतलेला निर्णय वैयक्तिक असल्याची इच्छा व्यक्त केली आहे.