उत्तर प्रदेशच्या ‘योगी’योगाची ८ वर्षे : बिमारू राज्य ते देशाचे ग्रोथ इंजिन
२२२ गुन्हेगारांचे एन्काउंटर, ७.६ लाख सरकारी नोकऱ्या, जीडीपीमध्ये २८ टक्क्यांची वाढ, ४५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक कसं आहे उत्तर प्रदेशातली योगी पर्व?
25-Mar-2025
Total Views |
नवी दिल्ली : ( yogi 8 years of Uttar Pradesh ) उत्तर प्रदेशचे रूपांतर गेल्या ८ वर्षात बिमारू राज्यातून देशाच्या ग्रोथ इंजिनात झाली आहे. राज्यात ७.६ लाख सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या असून २२२ गुन्हेगारांचे एन्काउंटर करून कायदा व सुव्यवस्था चोख करण्यात येत असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी लखनऊ येथे दिली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला येत्या २५ मार्च रोजी ८ वर्षे पूर्ण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर योगी सरकारने ‘सबका साथ, सबका विकास – उत्कर्ष के ८ वर्ष’ ही पुस्तिका प्रकाशित केली. मुख्यमंत्र्यांनी गेल्या ८ वर्षात राज्यात झालेल्या परिवर्तनाचा लेखाजोखा मांडला.
गेल्या आठ वर्षांत साडेसात लाखांहून अधिक तरुणांना कोणताही भेदभाव आणि भ्रष्टाचार न करता सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या चकमकीत २२२ गुन्हेगार मारले गेले आहेत. १७१ रोहिंग्या मुस्लिमांना अटक करण्यात आली आहे. १३० दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. आतापर्यंत २० हजार २२१ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.
या चकमकीत २० हजारांहून अधिक वॉन्टेड गुन्हेगारांनाही पकडण्यात आले. गँगस्टर कायद्याअंतर्गत १४२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. आज उत्तर प्रदेशने कायदा आणि सुव्यवस्थेत मोठी झेप घेतली आहे. महाकुंभ हे याचे एक ज्वलंत उदाहरण आहे, जिथे ४५ दिवसांत एकही दरोडा पडला नाही, छेडछाड झाली नाही, चोरी झाली नाही आणि कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी घटना घडली नाही. राज्य तेच आहे, व्यवस्था तीच आहे; मात्र सरकार बदलल्याने व्यवस्थेमध्ये आमूलाग्र परिवर्तन होत असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.
उत्तर प्रदेशचे कृषी क्षेत्र २०१७ पूर्वी उपेक्षित होते, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, उत्तर प्रदेश प्राचीन काळापासून कृषीप्रधान राज्य आहे. मुबलक संधी असूनही तत्कालीन राज्यकर्त्यांनी कृषीकडे दुर्लक्ष केले. परिणामी मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या वाढल्या होत्या. मात्र, आता परिस्थिती बदलली असून राज्याचा कृषी विकास दर १३.५ टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. यामुळे राज्याच्या जीडीपीमध्ये २८ टक्के वाढ झाली. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे ३६ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले, असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले.
गुंतवणूकस्नेही धोरण
· ८ वर्षांत, राज्याला अंदाजे ४५ लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक प्रस्ताव मिळाले. १५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे गुंतवणूक प्रस्ताव अंमलात आणले गेले आहेत.
· या माध्यमातून ६० लाखांहून अधिक तरुणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत आणि लाखो इतर लोकांसाठी रोजगार निर्माण झाला आहे.
· व्यवसाय सुलभतेअंतर्गत भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल सिंगल विंडो पोर्टलपैकी एक असलेल्या 'इन्व्हेस्ट मित्र'ची अंमलबजावणी. उद्योजकांना ४३ विभागांच्या ४८७ हून अधिक ऑनलाइन सेवा पुरवल्या जात आहेत.
· उद्योजकांकडून परवान्यांसाठी प्राप्त झालेल्या अर्जांपैकी ९७ टक्क्यांहून अधिक अर्जांना मंजुरी मिळण्याचे प्रमाण असल्याने, 'इन्व्हेस्ट मित्र' हे सध्या देशात कार्यरत असलेल्या सर्वात कार्यक्षम सिंगल विंडो पोर्टलपैकी एक आहे.
· आतापर्यंत, १२.५ लाखांहून अधिक मंजुरी डिजिटल पद्धतीने देण्यात आल्या आहेत.
· प्रधानमंत्री मित्र योजनेअंतर्गत, लखनौ आणि हरदोई येथे मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल अँड अपेरल पार्क, हरदोई आणि कानपूर येथे मेगा लीड क्लस्टर, गोरखपूरमध्ये प्लास्टिक पार्क, कन्नौजमध्ये परफ्यूम पार्क आणि गाझियाबाद, लखनौ, कानपूर नगर, गोरखपूर आणि हापूर येथे केमिकल अँड फार्मा पार्क यासारख्या क्षेत्रांचे काम सुरू आहे.